संत्र्याच्या सालीच्या वापराने 'या' समस्या होतील दूर..... संत्र्याचं साल फेकण्याआधी हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 04:18 PM2019-12-08T16:18:57+5:302019-12-08T16:58:05+5:30

हिवाळ्यात सगळ्याच ठिकाणी बाजारात संत्री पहायला मिळतात. संत्री खाल्ल्यानंतर आपण त्याचे साल फेकून देतो, पण संत्र्याइतकेच संत्र्याचं साल सुध्दा आरोग्यासाठी गुणकारक ठरतं. पिंपल्स दूर करण्यासाठी संत्रीचे साल वाळवून त्याचे चुर्ण तयार करा. आणि हे चुर्ण गुलाब जल किंवा दूधात टाकुन चेह-याला लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. आणि पिंपल्स दूर होतात. ब्लॅकहेड्स आणि सावळेपणा दूर होतो.( Image credit-stylecraze)

संत्रीचे ताजे फूल बारीक करुन त्याचा रस केसांना लावल्याने केसांची चमक वाढते. केस लवकर वाढतात आणि त्याचा काळेपणा वाढतो. (Image credit- stylecraze.com)

स्क्रबसाठीही संत्र्याच्या सालीचा वापर करता येतो. यामुळे कोणत्याही केमिकल्सतचा वापर न करता नैसर्गिक पध्दतीने त्वचेची काळजी घेऊ शकता.(Image credit-www.beautifull.in)

संत्र्याची साल दातांवर घासल्यास दातांचा पिवळटपणा दूर होतो. (Image credit-BK dental)

संत्रीच्या सालीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता असते. यामुळे भूक वाढते. पचनक्षमता, गॅस, अ‍ॅसिडिटी, मळमळ यांसारख्या समस्या दूर होतात. त्यासाठी संत्र्याची साल सुकवून तिची पावडर करावी. याचा आहारात समावेश कारावा.

केस कोरडे असतील तर संत्रीची साल तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. संत्रीच्या सालीची पावडर बनवून केसांना लावून काही वेळ ठेवा. नंतर केसांना स्वच्छ धुवा. तुमचे केस चमकदार दिसतील.