ब्लीचमुळे होणाऱ्या समस्या 'या' घरगुती उपायांनी करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 18:27 IST2019-09-06T17:58:20+5:302019-09-06T18:27:48+5:30

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
मिल्क क्यूब्स
एका बाउलमध्ये कच्चं दूध आणि पाणी एकत्र करा. ते आइस ट्रेमध्ये टाका. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. ब्लीच केल्यानंतर या ट्रेमधून एक क्यूब घ्या आणि चेहऱ्यावर मसाज करा. हे त्वचेला थंडावा देण्यासोबतच चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठीही मदत करेल. तसेच ब्लीचमुळे होणारी जळजळही दूर होइल.
कोरफड
कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर मसाज करा किंवा जेल आइस ट्रेमध्ये ठेवून त्याचे आइस क्यूब्स तयार करा. त्वचेवर झालेलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर ठरते.
नारळाचं पाणी
ब्लीचमुळे त्वचा बर्न होते. तुम्ही अशाच समस्येचा समाना करत असाल तर नारळाचं पाणी पिणं सुरू करा. यामुळे काही दिवसांमध्येच त्वचेची समस्या दूर होइल. टोनर म्हणूनही तुम्ही नारळांच्या पाण्याचा वापर करू शकता.
बटाट्याची साल
बटाट्याची साल काढा आणि ब्लीच केल्यानंतर चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे जळजळ आणि रॅशेजची समस्या दूर होते.
लॅव्हेंडर ऑइल
ब्लीचमुळे झालेल्या रॅशेजवर कापसाच्या मदतीने लॅव्हेंडर ऑइल लावा. त्यामुळे रॅशेज काही वेळातचं कमी होतात.
चंदनाची पावडर
एका बाउलमध्ये चंदनाची पावडर घ्या आणि ती गुलाब पाण्यासोबत एकत्र करून थिक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि जळजळ दूर करण्यासाठी मदत करते.
हळद आणि दही
एक चमचा हळदीमध्ये दोन चमचे दही एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा आणि चेहरा स्वच्छ करा. दही त्वचेला थंडावा देण्याचं काम करेल आणि हळद जळजळ आणि रॅशेज दूर करण्याचं काम करते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.