आंघोळ करताना साबणाऐवजी वापरा हे पदार्थ.... मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 03:48 PM2019-12-06T15:48:04+5:302019-12-06T17:14:55+5:30

हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी अंघोळ करणं गरजेचे आहे. अंघोळ करण्यासाठी पुरूष तसेच महिला या वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण घरच्या घरीच साबणाचा वापर न करता काही घरगुती वस्तु अंघोळीच्या पाण्यासोबत वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

गुलाबजल हे डोळ्यांसाठी उत्तम असते. त्याचप्रमाणे शरीरासाठी सुध्दा उपयुक्त असते. आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल मिसळून लावल्यास त्वचा उत्तम राहते.

खोबरेल तेलामुळे त्वचा मऊ राहते. यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही. एका बादलीत दोन चमचे टाकून ते पाणी आंघोळीसाठी वापरावे.

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई असते. यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. हे एका बादलीत अर्धा चमचा टाकावे.

आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास थकवा आला असल्यास शरीराला आराम मिळतो. आणि अंगदुखी दूर होते.

आठवडयातुन दोनदा दुधात बेसनाचे पीठ मिसळून पेस्ट तयार केला. यामुळे त्वचेतील रुक्षपणा निघून जाईल. आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.

आंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी च्या ४ ते ५ बॅग्स टाकून ते दहा मिनीट भिजवत ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. या पाण्यात डिटॉक्सीफायर गुण असतात. ते त्वचेला स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.