शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi special : रंगांनी खेळताना आजारांपासून बचाव करायचा असेल तर वापरा 'या' खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 3:56 PM

1 / 10
होळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. देशभरात कोरोना व्हायसरमुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे. अशात होळी खेळण्याचा मोह आपल्याला आवरता येणार नाही. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणं आणि काळजीपूर्वक होळी खेळणं गरजेचं आहे.
2 / 10
धुळवडीच्या रंगांमध्ये वापरले जाणारे केमिकलमुळे त्वचेला खाज आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. यामुळे त्वचेचेचे विकार होण्याची शक्यता असते.
3 / 10
रंगपंचमीला वापरले जाणारे कृत्रिम रंग केवळ त्वचेला नुकसान पोहोचवत नाही तर हे रंग डोळे, कान अथवा नाकात जाऊ शकतात.
4 / 10
डोळे हे आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग असतो. केमिकल रंगामुळे डोळ्याचा नसांना इजा पोहोचू शकतो. डोळ्यामध्ये रंग गेला तर डोळ्यांची जळजळ सुरू होते. अशा वेळेला डोळ्यांमध्ये रंग केल्यास काय उपाय करायचा जाणून घ्या.
5 / 10
जर डोळ्यात गुलाला अथवा रंग गेल्यास तर सगळ्यात आधी डोळे पाण्याने धुवून घ्या. यावेळी डोळ्यांना रगडू नका. यानंतरही डोळ्यांची जळजळ थांबली नाही तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
6 / 10
कानात रंग गेल्याने आजार परण्याची शक्यता असते. अशातच जर कानात पाणी गेले असेल डोके थोडे तिरपे करा ज्यामुळे कानातून पाणी बाहेर येईल. तर कानात रंग गेला असेल तर कानात कोमट तेल घाला.
7 / 10
जर कुणाला रंग खेळायचा नसेल तर त्याच्यासोबत जबरदस्ती करू नका. जबरदस्ती करताना रंग डोळ्यात जाऊ शकतो. त्यामुळे बरं होईल की, कुणालाही रंग लावण्याआधी त्या व्यक्तीला सांगावं, त्याला तयार राहण्यास सांगावं. रंग खेळताना कॉन्टॅक्ट लेन्स अजिबात वापरू नका. असे केल्यावर कॉन्टॅक्ट लेन्सवर रंग चिकटू शकतो. त्यानंतर डोळ्यात जळजळ आणि रुतल्यासारखं होऊ शकतं.
8 / 10
त्वचेची काळजी घेण्यासाठी रंग खेळण्यापूर्वी वीस ते पंचवीस मिनिटे बाडी लोशन अथवा सन्सक्रिम लावा. हे उपलब्ध न झाल्यास आपल्या घरात उपलब्ध असलेले खोबरेल तेल शरीराला, डोक्याला लावा. ज्यामुळे रंग लवलेले जास्त वेळ त्वचेला हानी पोचवत नाही.
9 / 10
याशिवाय केसांना रंग लावताना कुठल्याही परिस्थितीत त्याचा स्पर्श तुमच्या डोक्यावरील त्वचेला होणार नाही याची जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घ्या. रंगाचे त्वचेला स्पर्श होणे किंवा त्या मधिक केमिकल्स हे केसांना इजा पोहोचवण्यास कारणीभूत ठरतात
10 / 10
(image credit- BK reader)
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHoliहोळी