मानेचा काळपटपणा स्कार्फने लपवू नका, त्याऐवजी 'हे' घरगुती उपाय करा, काळपटपणा छुमंतर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:16 PM2022-04-10T19:16:51+5:302022-04-10T19:43:01+5:30

मान काळी असेल तर, चेहरा सुंदर दिसून काय उपयोग? मान काळी पडल्यानंतर आपल्याला आवडते कपडे घालता येत नाहीत किंवा ओढणी किंवा स्टोलने झाकावी लागते. उन्हामुळे मान काळी पडली असेल तर काही घरगुती उपाय(Home Remedies) करू शकता, त्याविषयी जाणून घेऊया.

चेहऱ्याची काळजी (Face Care) घेताना आपण मानेवर अन्यायच करतो. चेहरा धुवतानाही आपण मान व्यवस्थित धुत नाही (Neck does not Wash Properly).

मानेकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मान काळी पडली (Neck Turned Black) की मग लक्ष द्यायला लागतो.

मान चेहऱ्यासारखीच गोरी दिसावी याकरता आपण बरेच उपाय करतो. फेशियल, स्क्राबिंग, फेस पॅक हे सगळे उपाय चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी (Facial Beauty) केले जातात.

हळद आणि बेसन - बेसन त्वचेला एक्सफोलीएट (Exfoliate) करतं. त्यामुळे त्वचा तजेलदार होते. बेसनाने त्वचेच्या रोमन छिद्रांमध्ये साठलेली घाण देखील निघून जाते. 2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

बेकिंग सोडा - बेकिंग सोड्यामधील घटक काळी पडलेली मान स्वच्छ करण्यामध्ये अतिशय फायदेशीर आहेत. 1 चमचा पाण्यामध्ये 2 चमचा बेकिंग सोडा मिसळा याची पेस्ट आपल्या मानेवर लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे वापरल्यास आपली मान गोरी होईल.

बटाटा - बटाट्यामध्ये ब्लीचिंग घटक असतात. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते. याशिवाय पिंपल्स कमी होतात. बटाट्याचा लगदा तयार करून त्याचा रस काढा. कापसाच्या बोळ्यावर घेऊन काळ्या भागावर लावा. पूर्णपणे सुकल्यानंतर धुऊन टाका.

मध आणि टोमॅटो - मध, टोमॅटोचा रस, लिंबाचा रस एकत्र करून ही पेस्ट आपल्या मानेवर लावा. 20 मिनिटांनी सुकल्यानंतर धुऊन टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर केल्यास फरक नक्की जाणवेल.