इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:47 IST2018-02-05T14:43:29+5:302018-02-05T14:47:18+5:30

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला इंडिया ओपन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.
दिल्लीतील सिरी फोर्टमध्ये झालेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, ११-२१, २२-२० असा पराभव पत्करावा लागला.
बेईवान हिने पहिल्यांदाच सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.