शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yamaha ची पहिली EV स्कूटर भारतात लॉन्च; तब्बल 169 KM रेंज, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:01 IST

1 / 8
यामाहा मोटर इंडियाने भारतीय बाजारात आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 अधिकृतपणे लॉन्च केला आहे. या स्कूटरसह कंपनीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये पाऊल टाकले आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹1,67,600 ठेवण्यात आली आहे.
2 / 8
सुरुवातीच्या टप्प्यात हा स्कूटर निवडक शहरांमधील Yamaha Blue Square प्रीमियम डीलरशिप्समार्फत उपलब्ध होणार आहे. लॉन्चवेळी EC-06 Bluish White या एकाच रंगात सादर करण्यात आला आहे.
3 / 8
Yamaha EC-06 मध्ये 4kWh क्षमतेची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली असून, त्यासोबत IPMSM (Interior Permanent Magnet Synchronous Motor) वापरण्यात आली आहे. कंपनीनुसार ही मोटर 6.7 kW कमाल पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते.
4 / 8
या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी प्रतितास असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 169 किमीपर्यंतची रेंज मिळण्याचा दावा यामाहाने केला आहे. त्यामुळे दैनंदिन शहरातील वापरासाठी हा स्कूटर उपयुक्त ठरू शकतो.
5 / 8
EC-06 ला घरगुती साध्या वीज सॉकेटद्वारे चार्ज करता येते. स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. यामाहाकडून बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किमीची वॉरंटी, तर मोटर आणि बॅटरीसह इतर इलेक्ट्रॉनिक घटकांसाठी IP65 रेटिंग देण्यात आली आहे.
6 / 8
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Eco, Standard आणि Power असे तीन राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच अरुंद जागांमध्ये पार्किंग आणि हालचालीसाठी रिव्हर्स मोडही उपलब्ध आहे.
7 / 8
सस्पेन्शनसाठी पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे रियर कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढे-मागे 200 मिमी डिस्क ब्रेक्स आणि CBS (Combined Braking System) दिले आहे.
8 / 8
Yamaha EC-06 मध्ये कलर LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED लाईटिंग, Yamaha Motor Connect R अ‍ॅपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखी स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, स्कूटरमध्ये 24.5 लिटरचे अंडर-सीट स्टोरेज देण्यात आले असून, त्यात हेल्मेट किंवा दैनंदिन सामान सहज ठेवता येते.
टॅग्स :yamahaयामहाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड