ही आहे जगातली सर्वात महागडी कार, किंमत जाणून डोळे विस्फारतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:54 IST2019-03-26T19:50:27+5:302019-03-26T19:54:33+5:30

बुगाटी ही जगातली सर्वात महागडी कार आहे. या कारमध्ये 1500 हॉर्स पॉवर(15 फोर्ड फिएस्टा)चं इंजिन आहे, जे 1600 एनएमचं टॉर्क निर्माण करते.
या कारमध्ये 7 स्पीडच्या गिअरबरोबरच ड्युएल क्लच देण्यात आला आहे.
या कारमध्ये 8 लीटरसह 16 सिलिंडर देण्यात आले आहेत.
या कारची उंची 48 इंच, रुंदी 6 फूट 7 इंच आणि 17 फूट 7 इंच इतकी लांबी आहे.
या कारचा स्पीड 421 किमी प्रतितास आहे. ही कार 2.4 सेकंड्समध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितासच्या स्पीड पकडते.
15 लोकांच्या टीमनं ही कार बनवली आहे. या कारची किंमत 130 कोटी रुपये आहे.