तुमच्या डिझेल कारचा DPF का होतो चोकअप? 'ही' ५ कारणे वाचली तर वाचतील हजारो रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:24 IST2026-02-26T10:19:10+5:302026-02-26T10:24:33+5:30

What is DPF in Marathi : डिझेल कारमधील DPF खराब होण्याची मुख्य कारणे आणि ते टाळण्यासाठी सोप्या टिप्स. जाणून घ्या तुमची कार कशी सुरक्षित ठेवाल.

आजकालच्या आधुनिक डिझेल गाड्यांमध्ये (BS6) प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी DPF चा वापर केला जातो. मात्र, अनेकदा कारच्या डॅशबोर्डवर 'DPF Clogged' असा सिग्नल येतो आणि गाडीचा पिकअप कमी होतो.

वेळीच लक्ष न दिल्यास हा फिल्टर बदलावा लागतो, ज्याचा खर्च ५० हजार ते १ लाखांपर्यंत असू शकतो. तुमचा डीपीएफ का खराब होतो, याची ५ प्रमुख कारणे समोर आली आहेत.

कमी अंतराचा प्रवास : जर तुम्ही तुमची डिझेल कार फक्त ५-१० किलोमीटरच्या छोट्या अंतरासाठी वापरत असाल, तर इंजिन पूर्णपणे गरम होत नाही. परिणामी, कार्बनचे कण जळून जाण्याऐवजी फिल्टरमध्ये साचून राहतात.

कमी वेग आणि ट्रॅफिक : शहरात सततच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवल्यामुळे इंजिनचे तापमान वाढत नाही. डीपीएफ साफ होण्यासाठी (Regeneration) गाडी ठराविक वेळ वेगाने चालवणे आवश्यक असते.

चुकीचे इंजिन ऑईल : डिझेल इंजिनसाठी विशिष्ट प्रकारचे लो-ॲश ऑईल वापरणे गरजेचे असते. साधे ऑईल वापरल्यास त्यातील रसायने फिल्टरमध्ये अडकतात.

इंधन गुणवत्ता : हलक्या दर्जाचे किंवा भेसळयुक्त डिझेल वापरल्यामुळे जास्त प्रमाणात धूर निघतो आणि फिल्टर लवकर भरतो.

इन्जेक्टरमधील बिघाड : जर इंजिनचे फ्युएल इन्जेक्टर खराब असतील, तर ते जास्त डिझेल सोडतात, ज्यामुळे अपूर्ण ज्वलन होऊन कार्बनचे प्रमाण वाढते.

डीपीएफ सुरक्षित ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा हायवेवर ६०-७० किमी वेगाने २०-३० मिनिटे गाडी चालवा, जेणेकरून 'ऑटो रिजनरेशन' प्रक्रियेद्वारे कचरा जळून जाईल.

टॅग्स :डिझेलDiesel