इंजिन ऑईल वेळेवर न बदलल्यास काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:09 PM2019-09-23T16:09:22+5:302019-09-23T16:13:09+5:30

बरेचजण दुचाकी, चारचाकीचे इंजिन ऑईल बदलण्याकडे काणाडोळा करतात. काहींना तर माहितीही नसते की इंजिन ऑईल शेवटचे कधी बदलले आहे. कमी वापर असेल तर याकडे सपशेल दुर्लक्षच केला जातो. पण या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात अन्यथा कार किंवा दुचाकी वाटेतच बंद पडण्याची शक्यता असते.

इंजिन ऑईल वेळेवर न बदलल्याचा परिणाम इंजिनाला भोगावा लागतो. यामुळे इंजिन ऑईलची ल्युब्रिकंट क्षमता कमी होत जाते. यामुळे इंजिनमधील पिस्टन काम करण्यास असक्षम होऊ लागतात. याचा मायलेजवरही परिणाम होतो.

इंजिन ऑईल बदलण्याचा कालावधी हा त्या कारच्या कंपनीवर अवलंबून असतो. मारुतीला आधी 5000 किमी नंतर इंजिन ऑईल बदलावे लागत होते. आता नव्या कारमध्ये 10000 किमीनंतर बदलावे लागते. फोर्ड 10 हजार तर फोक्सवॅगनच्या कारना 15 हजार किमीनंतर ऑईल बदलावे लागते.

इंजिन ऑईल बदलल्याने परफॉर्मन्सही सुधारतो आणि वाहनाचा पिकअपही वाढतो. पिस्टन घासत नसल्याने इंजिन तापत नाही. यामुळे वाहन बंद पडत नाही. बराच काळ इंजिन ऑईल न बदलल्यास इंजिन डेड होण्याचा धोका असतो.

कंपन्यांनी 10 हजार सांगितले असल्यास अगदी 10 हजार किमीवरच इंजिन ऑईल बदलावे असे नाही. परंतू थोडे आधी किंवा 200 चे 400 किमी नंतर बदलावे जरूर.

इंजिन ऑईल न बदलल्यास इंधन जास्त लागते. इंजिन खूप तापते आणि आवाजही जास्त येतो. बऱ्याचदा इंजिन फेल होते. बाईकचा ब्लॉक पिस्टन खराब होतो. यामुळे ऑईलपेक्षा शंभरपटीने जास्त खर्च दुरुस्तीवर येतो.

इंजिन ऑईल खराब झालेले असल्यास सायलेन्सरमधून धूर येऊ लागतो. काही कारमध्ये 500 किमी आधी सर्व्हिस वॉर्निंग दिली जाते. बाजारात अनेक प्रकारची विविध कंपन्यांची ऑईल असतात. मात्र, तुमच्या वाहनासाठी कंपनीने ठरविलेले ऑईल टाकणे फायद्याचे ठरते.

बराच काळ इंजिन ऑईल न बदलल्यास इंजिन डेड होण्याचा धोका असतो.