Vehicle Ownership Transfer : मोटर वाहन नियमांत मोठे बदल; रजिस्ट्रेशनदरम्यान 'हे' काम केल्यास येणार नाही समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:30 PM2021-05-02T12:30:44+5:302021-05-02T12:37:21+5:30

Vehicle Ownership Transfer : पाहा नियमांत कोणता करण्यात आलाय बदल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये एक मोठा बदल केला आहे.

या नव्या बदलामुळे आता वाहन मालक नोंदणीच्या वेळी आपला वारसदार नेमू शकतात आणि नंतर ते अपडेटही करू शकतात.

हा नियम लागू झाल्यामुळे वाहनाच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यास वाहनाची मालकी घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

या नियमांच्या अंमलबजावणीमुळे केवळ वाहन मालकांनाच मदत होणार नाही, तर वाहन मालकांच्या मृत्यूनंतर नोंदणी असलेल्या व्यक्तीला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करणंही सोपं होणार आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे.

अधिसूचनेनुसार, मोटार वाहनाच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला आरसी बूकमध्ये वाहन मालकाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती वाहन मालकाच्या मृत्यूपासून तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत तसंच वाहन वापरू शकते.

तसंच यासाठी संबंधित व्यक्तीला आपल्या आरटीओला यासंदर्भातील माहिती तीस दिवसांच्या आत द्यावी लागेल.

याशिवाय मूळ मालकाचा मृत्यू झाला असून आपल्याला त्या वाहनाचा उपयोग करायचा आहे, अशी सूचना त्या व्यक्तीला आरटीओला द्यावी लागेल.

तसंच उत्तराधिकारी असलेल्या व्यक्तीनं वाहन मालकाच्या मृत्यूच्या तीन महिन्यांच्या आत आरटीओमध्ये फॉर्म ३१ मालकी हक्काच्या हस्तांतरणासाठी जमा करणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

यामुळे वाहन चालकांना वाहन ट्रान्सफर करण्यास मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Read in English