1 / 7इलेक्ट्रिक वाहने बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाबद्दल जगभरात सातत्याने चर्चा सुरुच असते. आता टेस्लाच्या गाड्या लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतात असंही म्हटलं जात आहे. मात्र आता सरकारने केलेल्या एका विधानामुळे याबद्दल शंका निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)2 / 7पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी टेस्ला भारतात येण्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यानंतर मस्क यांच्या टेस्लाच्या उद्योगाबाबत भारताने भूमिका स्पष्ट केली आहे. टेस्ला फक्त दोन शोरूम सुरू करू इच्छिते आणि कंपनीला भारतात उत्पादन करण्यात रस नाही, असं सरकारचे म्हणणं आहे.3 / 7अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले की, टेस्ला नजीकच्या भविष्यात भारतात इलेक्ट्रिक वाहने बनवणार नाही. टेस्ला बाजारात आणण्याची तयारी करत आहे, पण स्थानिक उत्पादन हा त्यांच्या योजनांचा भाग नाही. टेस्लाला भारतात फक्त दोन शोरुम सुरु करायचे आहेत. त्यांना भारतात उत्पादन करण्यात रस नाही.4 / 7मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शोरूमचे स्थान निश्चित करून आणि स्टोअर मॅनेजर आणि सर्व्हिस स्टाफसह भारतात दोन डझनहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवूनही, टेस्ला सध्या स्थानिक उत्पादनाचा विचार करत नाहीये. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)5 / 7कंपनीने भारतात आपल्या ईलेक्ट्रिक गाड्या विकण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून पुढील दोन ते तीन महिन्यांत बाजारात त्यांची पहिली कार लाँच होण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणाद्वारे जागतिक वाहन उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना न जुमानता ही प्रक्रिया सुरु आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)6 / 7भारताने मार्च २०२४ मध्ये टेस्लासारख्या मोठ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एक प्रमुख ईव्ही धोरण आणले होते, ज्यामध्ये उत्पादन वचनबद्धतेच्या बदल्यात कमी आयात शुल्क देण्यात आले होते. या धोरणानुसार, कंपन्या दरवर्षी ८,००० पर्यंत इलेक्ट्रिक वाहने १५ टक्क्यांच्या च्या लक्षणीयरीत्या कमी शुल्कात आयात करू शकतात. कंपन्यांनी तीन वर्षांत स्थानिक उत्पादन सुरू करण्यासाठी किमान ₹४,१५० कोटी गुंतवणूक केली तर ही सवलत देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)7 / 7दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला वाटते की टेस्लाची भारतात कोणताही कारखाना उघडण्याची योजना व्यवहार्य ठरणार नाही, असं म्हटलं होतं.