158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:46 IST
1 / 7TVS Orbiter: भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपन्या सातत्याने नवनवीन गाड्या लॉन्च करत आहेत. आता TVS ने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Orbiter लॉन्च केली आहे. ही कंपनीची तिसरी ई-स्कूटर आहे. यापूर्वी कंपनीने iQube आणि X लॉन्च केली आहे. 2 / 7ही नवीन स्कूटर एन्ट्री लेव्हल मॉडेल म्हणून लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ९९,९०० रुपये ठेवण्यात आली असून, कंपनीच्या वेबसाइटवर फक्त ५,००१ रुपयांमध्ये बुक करता येते. याची डिलिव्हरी २०२५ च्या दिवाळीनंतर सुरू होईल. 3 / 7टीव्हीएस ऑर्बिटर ३.१ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकसह येते. ही स्कूटर एका चार्जवर १५८ किमी पर्यंतची रेंज देते. ही रेंजमु स्कूटरला या सेगमेंटमध्ये खास बनवते, कारण आयक्यूबचा समान बॅटरी पॅक फक्त १२३ किमी पर्यंतची रेंज देतो, तर ३.५ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक देखील १४५ किमी पेक्षा जास्त जात नाही. 4 / 7कंपनीने ऑर्बिटरचे वर्णन 'भारतातील सर्वात एअरोडायनामिक ई-स्कूटर' असे केले आहे. यात एलईडी हेडलॅम्प, फ्रंट विंडस्क्रीन आणि १४-इंच अलॉय व्हील्स मिळतात. स्कूटरमधील २९० मिमी फूटबोर्ड अधिक लेगरूम देतो आणि ३४ लिटर अंडर-सीट स्टोरेज देखील आहे.5 / 7याशिवाय, त्यात दोन राइड मोड्स - इको आणि पॉवर आहेत. तसेच, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, क्रूझ कंट्रोल, हिल-होल्ड असिस्ट, यूएसबी चार्जिंग स्लॉट आणि रिव्हर्स मोड सारखी आधुनिक फिचर्स आहेत.6 / 7टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये रंगीत एलसीडी डिस्प्ले आहे जो स्मार्टफोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. याद्वारे, रायडरला कॉल अलर्ट, नेव्हिगेशन, लाईव्ह लोकेशन, जिओ-फेन्सिंग, फॉल डिटेक्शन, चोरीचा इशारा आणि ओटीए अपडेट्स सारखी हाय-टेक वैशिष्ट्ये मिळतात.7 / 7टीव्हीएस ऑर्बिटर ग्राहकांना ६ वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये निऑन सनबर्स्ट, स्ट्रॅटोस ब्लू, लूनर ग्रे, स्टेलर सिल्व्हर, कॉस्मिक टायटॅनियम आणि मार्टियन कॉपर यांचा समावेश आहे. अनेक रंग पर्यायांमुळे ते तरुण आणि स्टाईल प्रेमींसाठी आणखी खास बनते.