TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:45 IST
1 / 7TVS मोटर्सने आपली पहिली अॅडव्हेंचर टूरिंग बाईक Apache RTX 300 भारतात लॉन्च केली आहे. ही एक प्रीमियम, स्पोर्टी आणि तरुण रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली बाईक आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची स्पर्धा Royal Enfield Himalayan 440, KTM 250 Adventure आणि Yezdi Adventure सारख्या बाईक्सशी असणार आहे.2 / 7नवीन TVS Apache RTX 300 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.99 लाख पासून सुरू होते. ही बाईक TVS च्या नवीन नेक्स्ट-जनरेशन RT-XD4 इंजिन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाईक रेसिंग परफॉर्मन्स आणि लाँग-राइड कम्फर्टचा उत्तम समतोल साधते.3 / 7या प्लॅटफॉर्ममध्ये चार महत्त्वाच्या ड्युअल टेक्नॉलॉजीज दिल्या आहेत, ज्यात ड्युअल ओव्हरहेड कॅम आणि डाउनड्राफ्ट पोर्ट, ड्युअल ऑइल पंपसह स्प्लिट चेंबर क्रॅंककेस, ड्युअल कूलिंग जॅकेट सिलिंडर हेड (वॉटर जॅकेटसह) आणि ड्युअल ब्रीदर सिस्टमचा समावेश आहे.4 / 7या बाईकमध्ये 299.1cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड DOHC इंजिन दिलेले आहे, जे 36PS पॉवर (9000 rpm) आणि 28.5Nm टॉर्क (7000 rpm) निर्माण करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिपर क्लच मिळेल. यात रायडरसाठी चार राइड मोड्स - Urban, Rain, Tour आणि Rally दिले आहेत, ज्यामुळे हवामान किंवा रस्त्याच्या परिस्थितीनुसार परफॉर्मन्स बदलता येतो.5 / 7हँडलिंग आणि स्टेबलायझेशनसाठी यामध्ये पुढील बाजूस इनवर्टेड कार्ट्रिज फोर्क आणि मागे मोनो-ट्यूब फ्लोटिंग पिस्टन (MFP) सस्पेंशन दिले आहे. ही बाईक लाइटवेट स्टील ट्रेलिस फ्रेमवर आधारित असून, उत्तम बॅलन्स, मजबुती आणि डायनॅमिक परफॉर्मन्स देते. लो सीट हाइट, उत्कृष्ट पॉवर-टू-वेट रेशो आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सहज नियंत्रण तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.6 / 7Apache RTX 300 चे डिझाइन पूर्णपणे रॅली-इन्स्पायर्ड आहे. यात I-शेप LED हेडलॅम्प, LED इंडिकेटर्स, मस्क्युलर फ्युएल टँक, ट्रान्सपेरंट विंडस्क्रीन आणि बीक-स्टाइल फ्रंट डिझाइन दिलेले आहे. यात तुम्हाला Pearl White, Viper Green, Lighting Black, Metallic Blue, आणि Tarn Bronze असे रगं पर्याय मिळतील.7 / 7अॅडव्हान्स फीचर्स- Apache RTX 300 मध्ये तंत्रज्ञानाचे जबरदस्त मिश्रण आहे: फुल-कलर TFT डिस्प्ले, ज्यामध्ये कॉल/SMS अलर्ट, स्पीड, GoPro कंट्रोल आणि मॅप मिररिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, ABS मोड्स (Rally, Urban, Rain), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि क्रूझ कंट्रोलसारखे वैशिष्ट्ये मिळतील. यामुळे ही बाईक आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक फीचर्स असलेली अॅडव्हेंचर बाईक ठरते.