Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?; जाणून घ्या एक सौ एक किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 03:53 PM2021-03-29T15:53:52+5:302021-03-29T16:04:16+5:30

पाहा या ब्रँड्सच्या नावामागील रंजक गोष्टी

अनेकदा नावामध्ये एक विशिष्ट ओळख लपलेली असते. सामान्यत: आपण एखादं नाव ठेवतो तेव्हा त्याच्या मागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. परंतु तुम्हाला माहितीय का कार्सच्या नावामध्येसुद्धा काही गोष्टी लपल्या आहेत.

काही कंपन्यांची नावं त्यांच्या संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. तर अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या नावामागे काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत.

जर्मनीचा कार ब्रँड BMW लक्झरी कार सेगमेंटमध्ये नावाजलेला आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या Bavaria या ठिकाणी इंजिन निर्मितीचं करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं होतं. त्याचंच संक्षिप्त नाव हे BMW म्हणून ओळखलं जातं.

इटलीची प्रमुख कार उत्पादक कंपनी Fiat ही भारतात लोकप्रिय आहे. Fiat च्या इंजिनाचा वापर मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सनं आपल्या कार्समध्ये केला आहे. कंपनीनं 1899 मध्ये ट्युरिन येथे वाहन उत्पादन सुरू केलं. या कारखान्याचं नावं इटालियन ऑटोमोबिल्स फॅक्ट्की ऑफ ट्युरिन या नावानं ओळखलं जातं. याला इटालियन भाषेत Fabbrica Italiana Automobili Torino या नावानं संबोधलं जायचं. याचंच संक्षिप्त रूप FIAT हे आहे.

दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी ह्युंदाई हीदेखील भारतीय बाजारपेठेत सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. कोरियन भाषेत Hyundai चा अर्थ वर्तमान युग असा आहे. यावरच कंपनीचं नाव Hyundai असं ठेवण्यात आलं.

किया मोटर्सनं नुकतीच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या कारचं नाव दक्षिण कोरियन भाषेतील दोन अक्षरं 起 (ki) और 亞 (a) यांनी बनलं आहे. यातील 'कि' चा अर्थ उदय होणं किंवा बाहेर येणं आणि 'या' चा अर्थ पूर्व अथवा एशिया असा आहे. कंपनीच्या नावाचा पूर्ण अर्थ Rising From the east असा वाचला जातो.

Rolls-Royce ही ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे आणि अनेक वर्षांपासून लक्झरी कार उत्पादनांसाठी ओळखीची आहे. या ब्रँडचं नाव कंपनीच्या दोन संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. 1884 मध्ये फेडरिक हेनरी रॉयस (rederick Henry Royce) यांनी एका इलेक्ट्रिक/मेकॅनिकल बिझनेसची सुरूवात केली होती त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.

त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.

ऑटो सेक्टरमधील जुना ब्रँड म्हणून Mercedes-Benz ची ओळख आहे. यामध्ये त्यांच्या संस्थापकांचं नाव आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कार्ल बेंझ हे या ब्रँडचे संस्थापक होते. परंतु Mercedes हे नाव ऑस्ट्रियाचे बिझनेसमन एमिल जेलिनेक यांच्या मुलीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर आपण नंतर चर्चा करू.

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या तोडीस तोड देणारी सध्या दुसरी कंपनी नाही. या ब्रँडच्या नावामागेही एक गोष्ट आहे. याचं नाव सर्बियन शोधकर्ते निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1884 च्या दरम्यान अमेरिकेत प्रवास केला होता. ते आपल्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक वर्क्ससाठी प्रसिद्ध होते.

Datsun ही निस्सान या कंपनीचाच एक ब्रँड आहे. यातील DAT हे नाव त्याचे फायनॅन्सर्स डेन, आओयामा आणि टेकूची यांच्या नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासून करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीनं आपली छोटी कार SON च्या आधारावर याचं नाव DATSON हे ठेवलं. परंतु जपानी भाषेत SON चा अर्थ नुकसान असा होतो. म्हणून त्यानंतर त्यांनी या कारचं नाव DATSUN असं केलं.

फोर्ड या कंपनीची स्थापना 1914 मध्ये करणअयात आली. या कंपनीचं नाव त्यांचे संस्थापन Henry Ford यांच्या नावावर ठेवण्यात आलं. Henry Ford हे कंपनीच्या मालकाच्या रुपात जगातील सर्वात धनवान आणि परिचित लोकांपैकी एक होते.

या ब्रँडचंही नाव कंपनीचे संस्थापन Sakichi Toyoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं. टोयोडा हे वाल बोलण्यात आणि आधिक सुलभ होण्यासाठी याच्या स्पेलिंगमध्ये थोडे बदल करून ते टोयोटा असं करण्यात आलं.

स्कोडा ही कंपनीदेखील आपल्या प्रिमिअम कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडचं नाव कंपनीचे संस्थापक Emil Škoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.

या कंपनीचं मुख्यालय जर्मनीतील वोल्फ़्सबर्ग येथे आहे. १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अडॉल्फ हिटलरनं सामान्य लोकांच्या गरजा पुरवणारी एखादी कार तयार करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान अनेक कंपन्या कार उत्पादन करत होत्या. परंतु Beetle नं एक स्वस्त मॉडेल सादर केलं होतं आणि ते हिटलरला आवडलंही. यानंतर या कंपनीला Volkswagen हे नाव देण्यात आलं. Volks आणि wagen याचा जर्मन भाषेत अर्थ जनता आणि वाहन म्हणजेच जनतेचं वाहन असा होतो.