शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कष्टाचे पैसे पेट्रोलमध्येच खर्च होतायत? 'या' टिप्स फॉलो केल्याने कार देईल जबरदस्त 'मायलेज'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 6:06 PM

1 / 7
Tips To Improve Car Mileage: आपण कार विकत घेतल्यानंतर, काही काळाने कारचं मायलेज कमी होतो असा अनुभव तुम्हा साऱ्यांनाच आला असेल. मायलेज कमी झाला की पेट्रोलचा खर्च वाढतो आणि सारं बजेटच कोलमडतं.
2 / 7
काही मंडळी मात्र आपल्या कारचे मायलेज वर्षानुवर्षे चांगलं राहत असल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांच्या बजेटला फारसा फटका बसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगतो कारचं मायलेज वाढवण्यासाठीच्या काही टिप्स...
3 / 7
कारचे सर्व्हिसिंग नेहमी वेळच्या वेळी पूर्ण करा. कारचे इंजिन, ब्रेक, सस्पेन्शन आणि इतर भागांसह संपूर्ण कारसाठी ही बाब उपयुक्त असते. कारचे सर्व्हिसिंग वेळेवर झाली तर कारचा परफॉर्मन्स चांगला राहतो आणि मायलेजही चांगले राहते.
4 / 7
आक्रमक वेग आणि वारंवार ब्रेक लावणे यामुळे कारचे मायलेज कमी होते. त्यामुळे तुम्हाला स्मूथ ड्रायव्हिंग म्हणजे कार चालवण्यामध्ये सहजता आणावी लागेल. अक्सलेटर पेडल फार जोरात दाबू नका आणि कारचा वेग शक्य तितका एकसमान ठेवा, गरज असेल तेव्हाच ब्रेक लावा.
5 / 7
वेळोवेळी टायरचे प्रेशर तपासून पाहा. टायरच्या प्रेशरची पातळी योग्य असावी. टायरमधील एअर (हवा) प्रेशर कमी असेल, तर मायलेजवर परिणाम होतो.
6 / 7
खिडक्या उघड्या ठेवून कार चालवल्याने इंजिनवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे कारला जास्त पेट्राल लागते. चांगला मायलेज हवा असेल तर कारच्या खिडक्या बंद ठेवायचा प्रयत्न करा.
7 / 7
ओव्हरलोडिंगमुळे इंजिनवर अधिक ताण पडतो, कारण त्यामुळे कार चालवण्यासाठी अधिकची ऊर्जा लागते. यामध्ये इंजिन अधिक इंधन जाळते, ज्यामुळे मायलेज कमी होते. त्यामुळे ओव्हरलोडिंग टाळणे महत्त्वाचे आहे.
टॅग्स :AutomobileवाहनcarकारPetrolपेट्रोलAutomobile Industryवाहन उद्योग