1 / 8देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर आणली आहे. जून महिन्यात विक्री वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.2 / 8मारुती WagonR वर सर्वाधिक डिस्काउंट दिला जात आहे. या मॉडेलवर एकूण १ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळतेय. ही सूट वॅगनआरच्या सर्व मॉडेल्सवर मिळत आहे. ही कार टाटा टियागो आणि ह्युंदाई ग्रँड आय१० निओसशी स्पर्धा करते.3 / 8मारुती सुझुकीच्या डिस्काउंट ऑफरमध्ये २५,००० रुपयांपर्यंत रोख सूट, ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदे आणि १० हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस मिळत आहे आहे. 4 / 8याशिवाय, एक्सचेंज आणि स्क्रॅपेज बोनस १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत आहे. निवडक व्हेरिएंटवर एकूण १ लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर, सीएनजी मॉडेल्सवर ९५,००० रुपयांपर्यंतची ऑफर आहे. ही ऑफर शहर आणि डीलरनुसार थोडीशी बदलू शकते. ऑफरबद्दल अचूक माहितीसाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधा.5 / 8वॅगनआर किंमत आणि मायलेज- मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹५.५५ लाख पासून सुरू होते आणि ₹७.४२ लाख पर्यंत जाते. ही किंमत तिच्या वेगवेगळ्या प्रकार आणि वैशिष्ट्यांनुसार आहे. 6 / 8ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये (१.० लिटर आणि १.२ लिटर पेट्रोल इंजिन)उपलब्ध आहे. याशिवाय, याचा सीएनजी प्रकार देखील उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जन २४ किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते, तर सीएनजी व्हर्जन ३४ किमी/किलोपर्यंत मायलेज देते.7 / 8वॅगनआरची बॉक्सी डिझाइन कारला अधिक प्रशस्त बनवते. उंची आणि मोठ्या विंडशील्डमुळे कार अतिशय स्टायलिश दिसते. त्यात मोठी बूट स्पेस देखील आहे, जो लांब प्रवासात उपयुक्त ठरतो. 8 / 8नवीन वॅगनआरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, पॉवर विंडो, रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि ईबीडी सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.