या आहेत देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक; EV, EV करण्याआधी विचार करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:14 IST2025-02-07T15:06:14+5:302025-02-07T15:14:17+5:30

देशात सध्या ईलेक्ट्रीक स्कूटरची क्रेझ आहे. परंतू, देशात पेट्रोलच्या स्कूटर, मोटरसायकलही प्रचंड प्रमाणावर विकल्या जातात. ही बाजारपेठ काबिज करण्यासाठी ओलाने नुकतीच ईव्ही मोटरसायकल लाँच केली आहे. तरीही या पाच पेट्रोलवर चालणाऱ्या अशा मोटरसायकल आहेत, ज्यांना तोड काढणे कठीणच जाणार आहे. कारण यांचे मायलेज.
हिरो कंपनी ही देशातच नाही तर जगात नंबर एकला आहे. या कंपनीची हिरो एचएफ १०० चा खप जास्त आहे. ही बाईक ७० चे मायलेज देते. या बाईकमध्ये ९७. सीसीचे एअर कुल्ड ४ स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलेले आहे. किंमतही ५९ हजारांपासून सुरु होते.
टीव्हीएसची स्पोर्ट ही बाईकही जास्त मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. सिंगल सिलिंडर ४ स्ट्रोक फ्युअल इंजेक्शन इंजिन यात आहे. याची किंमतही ५९ हजारांपासून सुरु होते.
बजाज सीटी १०० ही बाईकदेखील सर्वाधिक मायलेजसाठी ओळखली जाते. या बाईकचे ७० किमीचे मायलेज आहे. ११.५ लीटरची टाकी देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 70,176 रुपयांपासून सुरु होते.
होंडा देखील यात मागे नाहीय. होंडा सीडी ११० ड्रीम डीलक्स ही बाईकही ७० च्या मायलेजसाठी ओळखली जाते. 9.1 लीटर पेट्रोलची टाकी यात दिलेली आहे. या बाईकची किंमत 74,401 रुपयांपासून सुरु होते.
टीव्हीएसची आणखी एक बाईक सर्वोत्त मायलेजसाठी ओळखली जाते. या बाईकमध्ये 124.8 सीसी इंजिन आहे. कमी उंचीच्या लोकांसाठी ही बाईक आहे. ६० किमी प्रति लीटरचे मायलेज देते.