भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 02:07 PM2021-09-18T14:07:54+5:302021-09-18T14:17:07+5:30

आता Tata Motors ने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari नवीन एक्सक्लूसिव गोल्ड एडिशन Gold Edition मध्ये लाँच केली आहे.

अलीकडील काळात Tata Motors ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक तसेच अन्य सेगमेंटमध्ये उत्तमोत्तम कार सादर करत आहे. एवढेच नव्हे, तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा कार्सचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच आता Tata Motors ने भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari नवीन एक्सक्लूसिव गोल्ड एडिशन Gold Edition मध्ये लाँच केली आहे.

Tata Motors ने एक्सक्लूसिव एडिशन व्हाईट गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड अशा २ आकर्षक रंगांमध्ये आणली आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन स्पेशल एडिशनमध्ये ही एसयूव्ही आणली आहे, ज्यामध्ये हायटेक फीचर्सही उपलब्ध असतील. नवीन Tata Safari Gold Edition एडिशन पहिल्यांदा दुबईत VIVO IPL 2021 मध्ये सार्वजनिकपणे दाखवले जाईल.

Tata Safari Gold Edition ला व्हाइट गोल्ड प्रीमियममध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलरची कॉन्ट्रास्ट फिनिशिंग देण्यात आले आहे. या व्हेरिअंटमध्ये ब्लॅक रूफ दिले असून, याला युनिक ड्युअल-टोन लूक प्राप्त होते. याशिवाय, कारला मॉन्ट ब्लँक मार्बल फिनिश मिड पॅडसह थोडी पण आकर्षक गोल्डन एक्सेंट आहे.

तर, ब्लॅक गोल्ड व्हेरिअंटमध्ये ब्लॅक एक्सटीरियरसोबत रेडिअंट गोल्ड एक्सेंटचा वापर करण्यात आलाय. ब्लॅक गोल्ड व्हेरिअंटच्या इंटीरियरमध्ये पूर्ण केबिनमध्ये डार्क मार्बल फिनिश मिड पॅड आणि गोल्डन ट्रीटमेंटचा प्रयोग केला आहे, जे एक्सटीरियरला पूरक आहे. नवीन Tata Safari Gold Edition मध्ये कंपनीने १८-इंच चारकोल ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहेत.

Tata Safari Gold Edition च्या इंटिरियरमध्ये ऑयस्टर व्हाइट डायमंड क्विल्टेड-ओरिजिनल लेदर सीट, पहिल्या आणि दुसऱ्या रांगेसाठी व्हेंटिलेशन सुविधा, वायरलेस चार्जर, एअर प्यूरीफायर, आणि वाय-फायवर अँड्रॉइड ऑटो-अॅपल कार-प्ले असे प्रीमियम फीचर्स मिळतात. याशिवाय शानदार सेफ्टी आणि अनेक लेटेस्ट फीचर्स स्टँडर्ड स्वरूपातही देण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सने नवीन Tata Safari Gold Edition च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, यामध्ये २.०-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनच दिले आहे. टाटा सफारी गोल्ड एडिशनला २१.८९ लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) सादर करण्यात आली आहे.

नवीन Tata Safari Gold Edition एडिशन पहिल्यांदा दुबईत VIVO IPL 2021 मध्ये सार्वजनिकपणे दाखवले जाईल. टाटा मोटर्सने या हंगामात 'सफारी गोल्ड हिट चॅलेंज' देखील आणले आहे.

याअंतर्गत एखाद्या फलंदाजाने दरवेळी षटकार मारल्यानंतर चेंडू कारवर किंवा कारच्या डिस्प्ले पोडियम किंवा सफारी #Gold LED कमर्शियल बोर्डवर पडल्यास, टाटा मोटर्स अक्षय पात्र फाउंडेशनला २ लाख रुपयांची मदत करेल. कोरोना मुक्तीच्या दिशेने काम करणारी ही एक स्वयंसेवी संस्था आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, Tata Motors आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. काही डीलरशिप्समध्ये नवीन Tiago CNG साठी अनधिकृत बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात झाली आहे.

ग्राहक ५ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर निवडक टाटा डीलरशिप्समधून ही कार बूक करू शकतात. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG लाँच होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच Tata Motors ची नवीन Tiago CNG ही कार टेस्टिंग दरम्यानही स्पॉट झाली होती.

सध्याच्या टियागोची बेसिक एक्स शोरुम किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिअंटची किंमत ७.०५ लाखापर्यंत जाते. लाँच झाल्यानंतर या कारची मारुती वॅगनआर सीएनजी, मारुती सिलेरियो सीएनजी, ह्युंडाई आय-१० सीएनजी अशा शानदार कारसोबत टक्कर असेल.