Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:16 IST2025-09-22T12:10:31+5:302025-09-22T12:16:43+5:30
GST Price Cut on Tata cars: टाटा मोटर्सने आपल्या सर्व गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत.

Tata Cars New Price List: देशभरात सध्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच GST रिफॉर्मची चर्चा सुरू आहे. नवीन या GST रिफॉर्ममुळे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी कपात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा ऑटोमोबाईल क्षेत्राची होत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. आता टाटा मोटर्सनेदेखील GST 2.0 लागू झाल्यानंतर आपल्या गाड्यांचे दर कमी केले आहेत.
आज टाटाने आपल्या सर्व गाड्यांचे नवीन दर जारी केले. यानुसार, कंपनी आपल्या कार्सवर एकूण 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. काही कारच्या किमती तर लॉन्चिंग किमतीपेक्षाही कमी झाल्या आहेत. आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी GST सवलतीव्यतिरिक्त अतिरिक्त बेनिफिटदेखील देत आहे. ही ऑफर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच लागू असेल.
Nexon- कंपनीची बेस्टसेलर SUV नेक्सॉनवर सर्वाधिक लाभ दिला जात आहे. ग्राहकांना यावर 1.55 लाख रुपयांपर्यंत GST कपात आणि 45,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळेच या SUV ची सुरुवातीची किंमत 7.31 लाख रुपये झाली आहे, जी आधी 8.00 लाख रुपये होती.
Curvv- अलीकडेच लाँच झालेल्या Curvv SUV मध्ये कुठलीही मोठी कपात होणार नाही अशी अपेक्षा होती. पण टाटाने येथेही 1.07 लाख रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपनीने याच्या किमतीत 67,000 रुपयांची कपात केली आहे. याशिवाय 40,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट दिले जात आहे. म्हणजेच एकूण बचत 1.07 लाख रुपयांची होईल.
Harrier आणि Safari- हॅरिअर आणि सफारीच्या किमतींमध्ये अनुक्रमे 1.44 लाख आणि 1.48 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. यांची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 13.99 लाख आणि 14.66 लाख रुपये झाली आहे. याशिवाय दोन्ही SUV वर 50-50 हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट दिले जात आहे. त्यामुळे एकूण बचत जवळपास 1.98 लाख रुपयांपर्यंत जाते.
Punch आणि Tiago- 2021 मध्ये 5.49 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीवर लॉन्च झालेली Punch पुन्हा त्याच दरात उपलब्ध झाली आहे. म्हणजे गेल्या चार वर्षांत वाढलेली महागाई आणि प्राइस हाइक कंपनीने पूर्णपणे संपवली आहे. त्याहून मोठा सरप्राईज Tiago चे आहे. ही कार आता फक्त 4.57 लाख रुपयांना मिळणार आहे. ही किंमत 2020 च्या लॉन्च प्राइसपेक्षा देखील कमी आहे.
Tata Tigor- टाटाची कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या किमतीत 81,000 रुपयांची कपात झाली आहे. मारुती डिजायरला टक्कर देणाऱ्या या कारची सुरुवातीची किंमत आता 5.48 लाख रुपये झाली आहे. याशिवाय या सेडानवर कंपनी 30,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट देत आहे. म्हणजेच एकूण बचत 1.11 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.