शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:50 IST

1 / 5
New Tata Altroz ​​Facelift Features Revealed: टाटा मोटर्स लवकरच त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक Altroz चे नवीन फेसलिफ्ट व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. या कारचा एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यात कारचे बदललेले डिझाईन आणि फिचर्सची माहिती देण्यात आली आहे. नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट 22 मे 2025 रोजी भारतीय बाजारात लॉन्च होईल. अल्ट्रोजमधील हे पहिले मोठे अपडेट असेल.
2 / 5
नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट पाच व्हेरिएंटमध्ये (स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड एस आणि अकम्प्लिश्ड+ एस) लॉन्च केली जाईल. कंपनीने कारच्या बाहेरील बाजूस अनेक मोठे बदल केले आहेत. नवीन अल्ट्रोझमध्ये आता नवीन डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs), फुल-एलईडी स्प्लिट हेडलाइट्स, नवीन फ्रंट ग्रिल आणि बंपर, फ्लश-फिटिंग इल्युमिनेटेड डोअर हँडल आणि नवीन 16 इंच 5-स्पोक अलॉय व्हील्स आहेत.
3 / 5
कारचा लूक मागील बाजूस अधिक स्पोर्टी बनवण्यात आला आहे. आता टी-आकाराचे एलईडी टेल लॅम्प मिळतील, जे एलईडी लाईट बारशी जोडलेले आहेत. यासोबतच, टेलगेटवरील 'अल्ट्रोझ' ब्रँडिंग आणि ड्युअल-टोन रिअर बंपरमुळे कार अधिक प्रीमियम बनते. नवीन अल्ट्रोज आता पाच नवीन रंग पर्यायांमध्ये (ड्यून ग्लो, अंबर ग्लो, प्रिस्टाइन व्हाइट, प्युअर ग्रे आणि रॉयल ब्लू) उपलब्ध असेल.
4 / 5
केबिनमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता हे पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम वाटते. यात नवीन 10.25 इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक एसी कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि 360 डिग्री कॅमेरा अशा अनेक हाय-टेक फिचर्स मिळतील. डॅशबोर्ड आता आधुनिक डिझाइनसह अपडेट करण्यात आला आहे, ज्यामुळे केबिनचा लूक खूपच प्रीमियम बनतो.
5 / 5
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेले 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि सीएनजी व्हेरिएंट पर्याय मिळत राहतील. ही नवीन फेसलिफ्ट अल्ट्रोज भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई आय20, मारुती बलेनो आणि टोयोटा ग्लांझा सारख्या लोकप्रिय कारशी थेट स्पर्धा करेल.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार