टाटाची नवी Harrier पाहा...स्टायलिश, दणकट आणि मोठीही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 19:27 IST2018-12-20T19:20:22+5:302018-12-20T19:27:15+5:30

टाटा मोटर्स नेक्सॉनच्या यशानंतर लेटेस्ट एसयुव्ही Harrier ही बहुचर्चित कार लवकरच लाँच करणार आहे. मिडिया ड्राईव्हसाठी टाटाने नुकतेच जोधपूरमध्ये Harrier कार लाँचिंग ठेवले होते. ही एसयुव्ही जानेवरीमध्ये लाँच होणार आहे.
टाटाच्या या ताकदवान एसयुव्हीची किंमत 16 ते 21 लाख रुपये असणार आहे. या एसयुव्हीची बुकिंगही सुरु करण्यात आली असून 30 हजार रुपयांमध्ये ही कार बुक करता येते.
मिडियासाठी ठेवलेल्या ड्राईव्हमध्ये या कारची व्हेरिअंटस्, फिचर्स, किंमत आणि रंग याबाबतचा खुलासा झाला आहे.
या कारला गेल्यावर्षीच्या दिल्ली ऑटोएक्स्पोमध्ये लाँच केले गेले होते. यावेळी या कारचे नाव H5X ठेवण्यात आले होते.
टाटा हॅरिअरचे इंजिन 2.0 लीटरचे आहे. या कारला 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4×2 व्हील ड्राइव ऑप्शन देण्यात आला आहे.
सध्या 5 सीटर व्हेरिअंट लाँच होणार असून वर्षाच्या शेवटी 7 सीटर व्हेरिअंट लाँच केले जाईल.
Harrier ला प्रथम चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
XE, XM, XT आणि XZ असे हे व्हेरिअंट असणार आहेत.
लांबी, रुंदीला Harrier ह्युंदाईच्या क्रेटा आणि फियाटच्या कंपासपेक्षा जास्त असून यामुळे जास्त लेग आणि शोल्डररूम मिळत आहे.