पाहा नव्या Alto चे जबरदस्त Photos; एक्सटीरिअर कमाल, तर इंटिरिअरही वाटेल लक्झरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:42 PM2022-08-04T16:42:42+5:302022-08-04T16:48:16+5:30

मारुती सुझुकीच्या नवीन अल्टोची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. कंपनीची सर्वात स्वस्त हॅचबॅक असण्यासोबतच ती मोठी, बोल्ड आणि सुंदरही आहे.

मारुती सुझुकीच्या नवीन अल्टोची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. कंपनीची सर्वात स्वस्त हॅचबॅक असण्यासोबतच ती मोठी, बोल्ड आणि सुंदरही आहे. आत्तापर्यंत त्याचे फक्त स्पाय फोटोच समोर आले होते, पण आता नवीन अल्टोचे एक्सटीरियर, इंटिरियर आणि रंग असे सर्वच डिटेल्स समोर आले आहेत. हे फोटो Rushlane Spylane ने लीक केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही नवीन अल्टो पहिल्याच नजरेत आवडेल. त्याचं डिझाईन मारुती सेलेरियो सारखेच आहे. एवढेच नाही तर तुम्हाला अधिक स्पेसही मिळणार आहे. 18 ऑगस्ट रोजी मारूती ही कार लाँच करणार आहे. पाहुयात या कारचे जबरदस्त फोटो आणि काय आहे या कारमध्ये खास.

नवीन Alto K10 च्या फ्रन्टबद्दल सांगायचे झाल्यास, यात नवीन डिझाइन केलेले ग्रिल मिळेल. हे डिझाईन थोडे Hyundai Nios i10 सारखे दिसते. कारच्या बॉनेटच्या दोन्ही बाजूंना डिझाइन देण्यात आले आहे. मागील बाजूस, त्याची रचना सेलेरियो सारखीच आहे. त्तर दुसरीकडे यात स्टील रिम्स मिळतील. जे व्हील कॅपसह येईल. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ORVM देण्यात आले आहेत. कारच्या आजूबाजूला वेगवेगळ्या सेक्शनमध्ये क्रोमचाही वापर करण्यात आला आहे.

नवीन Alto K10 च्या इंटीरियरबद्दल सांगायचे तर, कंपनीने तरुणाईला लक्षात घेऊन ते अतिशय सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा डॅशबोर्ड मॅट ब्लॅक कलरमध्ये दिसत आहे. डॅशबोर्डच्या मध्यभागी 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करेल. स्मार्टफोनच्या ब्लूटूथला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही त्यावर कॉल, मेसेज, नेव्हिगेशन यासारख्या सुविधांचा वापर करू शकाल. इन्फोटेनमेंटच्या वरील बाजूला AC आहे आणि खालील बाजूला AC स्विच आणि बटणे आहेत. यात S-Presso प्रमाणेच स्पीडोमीटर (ओडोमीटर) आहे. दरम्यान, स्टिअरिंगवर कोणतीही बटणे दिसत नाहीत.

मारुतीची ही हॅचबॅक तुम्ही सहा रंगांमध्ये खरेदी करू शकाल. यामध्ये सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ABS सारखे फीचर्स स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील. कारच्या मागील सीट आणि बूट स्पेसचे कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत. नवीन अल्टो सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी आणि स्पेशिअस आहे.

Maruti Alto K10 च्या लीक झालेल्या दस्तऐवजानुसार, ही हॅचबॅक कार STD, LXi, VXi आणि VXi + व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली जाईल. या सर्वांमध्ये (O) व्हेरिअंटही उपलब्ध असेल. ऑटो गियर शिफ्ट (AGS) सह ही कार तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. या सर्व व्हेरिअंटमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

नव्या Alto K10 मध्ये 998cc नॅचरली एस्पिरेटेड K10C पेट्रोल इंजिन मिळेल, जे 5,500 RPM वर 66 bhp पॉवर आणि 3,500 RPM वर 89 Nm टॉर्क जनरेट करेल. मारुतीने हे इंजिन Celerio, New S-Presso आणि WagonR मध्येही देण्यात आले आहे. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स तसेच 5-स्पीड AGS (AMT) पर्यायासह दिले जाईल. NCT नोंदणी कागदपत्रांनुसार, Alto K10 भारतात विकल्या जाणार्‍या Alto पेक्षा मोठी आहे. नवीन Alto K10 ची लांबी 3,530mm, रुंदी 1,490mm, उंची 1,520mm आणि व्हीलबेस 2,380mm आहे. कारचे वजन 1,150 किलो आहे. 2022 मारुती अल्टोची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.50 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.