जबरदस्त लूकसह सादर झाली Royal Enfield ची क्रुझर बाईक, पाहा डिटेल्स आणि Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 11:29 AM2022-11-09T11:29:12+5:302022-11-09T11:34:33+5:30

EICMA 2022 इव्हेंटमध्ये रॉयल एनफिल्डने आपली सर्व नवीन क्रूझर मोटरसायकल Super Meteor 650 सादर केली आहे.

EICMA 2022 इव्हेंटमध्ये रॉयल एनफिल्डने आपली सर्व नवीन क्रूझर मोटरसायकल Super Meteor 650 सादर केली आहे. या मोटारसायकलवर कंपनी बरेच दिवस काम करत होती. इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी नंतर कंपनीचे हे तिसरे 650cc मॉडेल आहे.

दिसण्यामध्ये हे मॉडेल थोडेफार बजाज अॅव्हेंजर सारखे दिसते. या जबरदस्त बाईकमध्ये दोन एक्झॉस्ट (सायलेन्सर) दिसत आहेत. Super Meteor 650 मध्ये 1,500mm लांब व्हीलबेससह एक लो प्रोफाईल देण्यात आलेय. याचं डिझाईन Meteor 350 प्रमाणेच आहे. ही मोटरसायकल दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलीये. यामध्ये स्टँडर्ड आणि टूरर यांचा समावेश आहे.

टूरर ट्रिममध्ये एक लांब विंडस्क्रीन, एक पिलर बॅकरेस्ट, ड्युअल सीट, पॅनिअर, एक टुरिंग हँडलबार आणि मोठ्या फुटपेगसारख्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. ही मोटरसायकलमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलेय.

Super Meteor 650 ला इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल GT सारखीच 648cc, पॅरलल-ट्विन मोटर देण्यात येते. ही बाईक 7250rpm वर 46.2bhp ची पॉवर जनरेट करते. तर टॉर्क आऊटपूट पूर्वीप्रमाणेच 52Nm आहे.

डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर हे Meteor 350 प्रमाणेच दिसते. याशिवाय मेन क्लस्टरसोबत रॉयल एनफिल्डचं ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम आहे. या ठिकाणी हेडलँप आणि टेललँपमध्ये एलईडीचा समावेश करण्यात आलाय. तर टर्न इंडिकेटर्समध्ये बल्ब देण्यात आलेत.

Super Meteor 650 मध्ये 19-इंच आणि 16-इंच अलॉय व्हील्स मिळतात. ज्यात 43mm अपसाइड-डाउन फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग्स मिळतात. ब्रेकिंग सिस्टमसाठी पुढील बाजूला 320mm डिस्क आणि मागील बाजूस 300mm रोटर देण्यात आला आहे.