शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

येतेय २४० किमी रेंज असलेली दमदार Electric Scooter; पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 4:17 PM

1 / 10
सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यावेळी 15 ऑगस्टचा दिवसही विशेष ठरणार आहे.
2 / 10
एकीकडे 15 ऑगस्ट रोजी OLA इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमधील एक स्टार्टअप Simple Energyदेखील आपली पॉवरफुल इलेक्ट्रीक स्कूटर याच दिवशी लाँच करणार आहे.
3 / 10
या स्कूटरचं नाव Simple One असं असणार आहे. तसंच मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्कूटरची रेंज अतिशय जबरदस्त असेल. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 240 किमीपर्यंत जाऊ शकते.
4 / 10
दरम्यान, लाँच पूर्वीच या स्कूटरची किंमत लीक झाली आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार या स्कूटरची किंमत 1.1 लाख रूपये ते 1.2 लाख रूपयांदरम्यान असेल. दरम्यान, ही या स्कूटरची एक्स शोरूम किंमत असेल. याच्या ऑन रोड किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
5 / 10
या किंमतीत सिंपल वन या स्कूटरची टक्कर Ather 450x आणि 450 Plus यांसारख्या इलेक्ट्रीक स्कूटर्सशी असेल.
6 / 10
ही स्कूटर अतिशय पॉवरफुल स्कूटर असेल असं म्हटलं जात आहे. तसंच याची स्पेसिफिकेशनही उत्तम आहेत. ही स्कूटर इको मोडमध्ये 240 किमीपर्यंत जाऊ शकते असा दावा करण्यात येत आहे.
7 / 10
या स्कूटरचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रति तास इतका आहे. या स्कूटरमध्ये 4.8kWh ची बॅटरी असू शकते. फीचर्सच्या बाबतीतही ही स्कूटर मागे नाही. यामध्ये टचस्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी आणि नेव्हिगेशनसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
8 / 10
सिंपल एनर्जी ही एक स्टार्टअप कंपनी आहे. भारतातील इलेक्ट्रीक मोबिलिटी क्षेत्रात काही महिन्यांपूर्वीच या कंपनीने एन्ट्री केली आहे.
9 / 10
Simple Energy (सिंपल एनर्जी) ही स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहिमध्ये ही स्कूटर लाँच करणार होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लाँचिंग टाळण्यात आले. आता कंपनी अधिकृतरित्या इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच करणार आहे.
10 / 10
15 ऑगस्टला ओला आणि सिंपल एनर्जी या दोन्ही कंपन्यांच्या स्कूटर्स लाँच होत आहेत. त्यामुळे ग्राहक कोणत्या स्कूटरला सर्वाधिक पसंती देतायत हे पाहावं लागेल.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारतOlaओलाscooterस्कूटर, मोपेड