नेक्स्ट जेन Skoda Octavia होणार लाँच; सध्याच्या मॉडेलवर मिळतेय 8 लाखांपर्यंतची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:40 PM2021-04-07T15:40:00+5:302021-04-07T15:46:05+5:30

प्रीमिअम कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ठरू शकतो बेस्ट ऑप्शन

देशातील नावाजलेली वाहन कंपी Skoda भारतीय बाजारात आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनीनं कंबरही कसली आहे.

कंपनीनं नुकतंच Skoda Octavia या कारचं प्रोडक्शन सुरू केलं आहे. तसंच लवकरच ही कार बाजारात लाँचही केली जाणार आहे.

परंतु या कारचं जुनं व्हर्जन अद्यापही बाजारात उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीनं Skoda Octavia RS245 वर बंपर डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कंपनी Skoda Octavia RS 245 चं नवं व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे Skoda Octavia RS 245 चा स्टॉक अजूनही बाजारात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.

कंपनीनं ही कार गेल्या वर्षी लाँच केली होती. ऑटोकारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कंपनी या कारच्या डिलरशिपद्वारे स्टॉक करण्यासाठी यावर 8 लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे.

प्रीमियम सेडान सेगमेंट ही कार जबरदस्त पॉवरसाठी प्रसिद्ध आहे. हे कंपनीद्वारे सादर केलेले दुसरे आरएस मॉडेल आहे.

यापूर्वी 2017 च्या सुरुवातीला कंपनीने आरएस 230 हे मॉडेल लाँच केलं होतं.

परंतु त्या मॉडेलच्या तुलनेत नव्या मॉडेलमध्ये मोठ्या चाकांसह नवीन इंजिन देखील वापरण्यात आलं आहे.

कंपनीने ही कार लिमिटेड नंबरमध्ये लाँच केली, त्यानंतर ती बंद करण्यात आली. तथापि, काही डीलरशिपमध्ये स्टॉकमध्ये ही कार उपलब्ध आहे.

Skoda नं या कारमध्ये 2.0 लिटर क्षमतेचं 4 सिलिंडर असलेलं जबरदस्त इंजिन दिलं आहे. हे इंजिन 245PS ची पॉवर आणि 370Nm चा टॉर्क जनरेट करते.

7 स्पीड ड्युअलल क्लच ट्रान्समिशन गिअरबॉक्स असलेल्या या कारमध्ये 9 एअरबॅग्स, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर, पॅसेंजर्स सीट, 8 इंचाचा टचस्क्रिन, लेदर सीट आणि 12.3 इंचाचं डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे.

जबरदस्त इंजिन आणि फीचर्स असलेल्या या कारची एक्स शोरूम किंमत 35.99 लाख रूपये आहे.

गेल्या ऑटोएक्सपोमध्ये पहिल्यांदा कंपनीनं ही कार लाँच केली होती आणि एप्रिल 2020 पर्यंत या कारची विक्री झाली होती.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक डिलरशीपकडे अजूनही या कारचा स्टॉक आहे.

सध्या कंपनी या कारच्या नेक्स्ट जनरेशनवर काम करत आहे. लवकरच ती कारही लाँच केली जाईल. (टिप: यात देण्यात आलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर आहे. काही ठिकाणी ही कार उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये डिलरशीपनुसार याची किंमत निराळी असू शकते.)