Maruti Suzuki च्या 'या' ७ सीटर कारची जबरदस्त विक्री; डिलिव्हरीसाठी पाहावी लागतेय महिनोंमहिने वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 11:07 AM2021-07-29T11:07:22+5:302021-07-29T11:14:01+5:30

Maruti Suzuki : देशातील बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या गाड्यांच्या विक्रीचा हिस्सा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ७ सीटर कार ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस उतरत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे बहुतेक लोक इंधनाच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. इंधनाच्या किंमतीविरूद्ध काही पैसे वाचविण्याच्या या संघर्षात सीएनजी वाहने हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहेत.

जरी इलेक्ट्रीक वाहने देखील एक चांगला पर्याय म्हणून उपस्थित आहेत, परंतु पायाभूत सुविधा आणि जास्त खर्च केल्यामुळे ही वाहने सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत. सीएनजी कार्सच्या बाबतीत तर या बाबतीत मारुती सुझुकी प्रथम क्रमांकावर आहे.

मारुती सुझुकीकडे सर्वात मजबूत सीएनजी वाहन पोर्टफोलिओ आहे आणि सुमारे ६ मॉडेल्स या पोर्टफोलिओच समाविष्ट आहेत.

हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती वॅगनआर सीएनजी देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहेय परंतु ७ सीटर सीएनजी म्हणून मारुती सुझुकी अर्टिगा चांगली कामगिरी करत आहे.

कमी किंमत, चांगले मायलेज आणि बसण्याची उत्तम क्षमता यामुळे ग्राहकांकडून या कारला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Maruti Ertiga च्या या वर्षीच्या विक्रीकडे पाहिलं तर पहिल्या तिमाहीत कंपनीनं जवळपास ७,५८३ युनिट्सची विक्री केली आहे.

गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कारच्या केवळ ८०३ युनिट्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत या वर्षी विक्री झालेल्या कार्सचं प्रमाण अधिक आहे.

गेल्या वर्षी देशातील वाहन क्षेत्राला कोरोना महासाथीचा मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे गेल्या वर्षी इंधनाच्या किंमतीही इतक्या प्रमाणात वाढलेल्या नव्हत्या.

तथापि, जास्त मागणीमुळे, या कारचा प्रतीक्षा कालावधी सतत वाढत आहे. आपल्याला काही शहरांमध्ये मारुती अर्टिगा सीएनजी कारसाठी ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

लखनौ, नॉएडा आणि गोरखपूरसारख्या शहरांमध्ये या कारसाठी तब्बल २० ते २५ आठवड्यांपर्यंतही प्रतीक्षा कालावधी आहे. या कारचा परफॉर्मन्स आणि अन्य गोष्टी पाहता ग्राहक अनेक महिने थांबण्यासही तयार असल्याचं दिसून येत आहे.

मारूती सुझुकीची कार अर्टिगा ही सीएनजी कीटसहदेखील येते. या कारमध्ये कंपनीनं १.५ लीटर क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे.

या कारचं सीएनजी व्हेरिअंट ९२ पीएस पॉवर आणि १२२ एनएमचा टॉर्क जनरेट करतं. सीएनजीमध्ये केवळ VXI हे एकमेव मॉडेल येतं.

या कारमध्ये कंपनीनं ७ इंचाच एन्फोटेन्मेंट सिस्टम, एलईडी टेल लँप, फॉग लँप, प्रोजेक्टर हेड लँप, वेंटिलेटेड फ्रन्ट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन, मागील सीटसाठी एसी वेंट्स आणि रिव्हर्स पार्किंगसारखे सेन्सर देण्यात आले आहे.

या कारचा फ्युअल टँक सुरक्षित असून सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वोतपरी लक्ष देण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामध्ये इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.

पेट्रोल व्हेरिअंटची किंमत ७.८१ लाख रूपयांपासून सुरू होते. परंतु या कारच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत ९.४६ लाख रूपये एक्स शोरूमपासून सुरू होते. ही कार २६.०८ किमी प्रति किलोग्रामचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.