किंमत कमी, मायलेज जास्त! नवी कोरी Maruti WagonR लॉंच; पाहा, दमदार फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 01:11 PM2022-02-27T13:11:43+5:302022-02-27T13:20:05+5:30

देशातील सर्वाधिक पसंतीची Maruti Suzuki WagonR आता नव्या रुपात लॉंच करण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स...

भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली नवीन उत्पादने लॉंच करताना पाहायला मिळत आहेत. यातच या स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी Maruti Suzuki कंपनीनेही कंबर कसली असून, आक्रमकपणे नवीन उत्पादनांवर काम करत आहे.

Maruti Suzuki कंपनी येत्या काही काळात Ertiga, XL6, Alto आणि WagonR चे अपडेटेड व्हर्जनवर काम करीत आहे. याशिवाय, नवीन विटारा ब्रेझा आणि एकदम नवीन मिड साइज एसयूव्ही तयार करत आहे. यापैकी काही कार यावर्षीच्या अखेरीस लॉंच केल्या जाऊ शकतात.

देशातील अनेकांची पसंत असलेली Maruti Suzuki WagonR आता कंपनीने नव्या रुपात आणली आहे. नवीन Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. जास्त मायलेजसोबत खूप सारे नवीन फीचर्स आणि ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये आहे.

Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्टचे सीएनजी मॉडल सुद्धा लाँच करण्यात आले आहे. २०२२ नवीन वेगनआर फेसलिफ्ट जुन्या मॉडलच्या तुलनेत २३ हजार रुपये महाग आहे. नवीन वेगनआर फेसलिफ्ट जुन्या वेगनआरपेक्षा वेगळी आहे.

Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्टला ५ लाख ३९ हजार ५०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स शोरूम) सोबत लाँच केले आहे. जुन्या मॉडलची किंमत ५.१६ लाख रुपयांपासून सुरू होते. वेगनआर फेसलिफ्टच्या LXI S CNG, LXI S-CNG Tour H3 आणि VXI S-CNG ३ सारख्या सीएनजी व्हेरियंट्स सुद्धा आहे. याची किंमत ६.३४ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते.

Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्ट LXi, VXi, ZXi, ZXi+ आणि ZXi+ Dual-Tone सारख्या ट्रिम लेवल १३ व्हेरियंट्स मध्ये आणले आहे. ज्याची किंमत ५.३९ लाख रुपये ते ७.१० लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे.

२०२२ नवीन मारुती वेगनआरला १.० लीटर पेट्रोल इंजिन आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन सोबत सीएनजी ऑप्शन मध्ये आणले आहे. याचे मायलेज जुन्या वेगनआरच्या तुलनेत जास्त आहे. वेगनआर फेसलिफ्टच्या १.० लीटर पेट्रोल इंजिन मॉडलचे मायलेज १६ टक्के वाढून २५.१९ किमी प्रति लीटर करण्यात आली आहे.

तर १.२ लीटर पेट्रोल मॉडलचे मायलेज १९ टक्के वाढून २४.४३ किमी प्रति लीटर करण्यात आले आहे. नवीन वेगनआर फेसलिफ्ट सीएनजीचे मयालेज आता ३४ किमी-किग्रॅ चे करण्यात आले आहे. नवी मारुती वेगनआर फेसलिफ्टला कंपनीने पॅसेंजर टॅक्सी सेगमेंट मध्ये आणले आहे.

यासोबतच कंपनीने २०२२ वेगनआर फेसलिफ्टला १२ हजार ३०० रुपये मंथली सब्सक्रिप्शन वर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात रजिस्ट्रेशन, सर्विस आणि मेंटनेंस सोबत इंन्शूरेन्स आणि रोडसाइड असिस्टेंसची सुविधा दिली आहे. नवीन मारुती वेगनआर फेसलिफ्ट मध्ये अनेक खास एक्सटीरियर आणि इंटिरियर फीचर्स जोडले आहे.

Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्ट या हॅचबॅक मध्ये अपडेटेड के-सीरीज इंजिन दिली आहे. जी स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजी सोबत येते. या हॅचबॅकला आता ड्युअल टोन कलर ऑप्शन मध्ये आणले आहे. सोबत स्पोर्टी अलॉयड व्हील्ज दिले आहे.

नवीन वेगनआर मध्ये ड्युअल टोन इंटिरियर सोबत ७ इंचाचा स्मार्टप्ले स्टूडिओ सिस्टम, स्मार्टफोन नेव्हिगेशन आणि ७ स्पीकरचे ऑडियो सिस्टमची सुविधा आहे. यासोबतच खूप सर्व स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स दिले आहेत. एकूण सर्व पाहिल्यास नवीन वेगनआर आधीच्या तुलनेत खूप अपडेटेड आणि खास दिसत आहे.

नवीन Maruti Suzuki WagonR 2022 फेसलिफ्टला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गेल्या महिन्यात देशात सर्वाधिक विक्री वेगनआरची झाली होती.