Mahindra च्या नवीन गाड्यांवर 81500 रुपयांपर्यंत सूट; ऑफर संपण्यास फक्त काही दिवस शिल्लक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 13:52 IST2021-10-18T13:44:38+5:302021-10-18T13:52:21+5:30
Mahindra Car Discount Offers : कंपनी आपल्या एसयूव्हीवर 81,500 रुपयांपर्यंत बंपर सवलत देत आहे.

Mahindra Car Discount Offers : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) सणांच्या निमित्ताने आपल्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. अनेक वाहन उत्पादकांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत, तर महिंद्रा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्रीला चालना देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निवडक गाड्यांच्या मॉडेल्सवर आकर्षक सूट आणि लाभ देत आहे.
कंपनी आपल्या एसयूव्हीवर 81,500 रुपयांपर्यंत बंपर सवलत देत आहे. ऑफर अंतर्गत, यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि अतिरिक्त ऑफर सारखे फायदे आहेत. विशेष म्हणजे, कंपनीची ही योजना 31 ऑक्टोबर पर्यंत लागू आहे. जर तुम्ही या सणामध्ये नवीन महिंद्रा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे.
Mahindra Bolero
महिंद्राची सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही बोलेरो ऑक्टोबर महिन्यात फक्त 3,000 रुपयांच्या सूट देत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या ऑफर अंतर्गत कंपनी या एसयूव्हीवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत देत आहे. बोलेरोची एक्स-शोरूम किंमत 8.72 लाख रुपयांपासून सुरू होते, ती सर्व 9.70 लाख रुपयांपर्यंत आहे. महिंद्रा बोलेरोला 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळते.
हे इंजिन 75 PS पॉवर आणि 210 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा बोलेरोला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ-इनेबल म्युझिक सिस्टिम, कीलेस एंट्री, एसी आणि पॉवर स्टीयरिंग सारखे फिचर्स मिळतात. कंपनीने अलीकडेच बोलेरोची रिप्लेस करण्यासाठी महिंद्रा बोलेरो निओ एसयूव्ही लाँच केली आहे.
Mahindra Scorpio
महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियो ऑक्टोबर महिन्यात 22,320 रुपयांपर्यंत एकूण लाभांसह ऑफर केली जात आहे. कंपनी आपल्या या एसयूव्हीवर कोणतीही रोख सवलत देत नाही. कंपनी 5,000 रुपये एक्सचेंज बोनस, 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत, याशिवाय 13,320 रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ देत आहे. सध्याच्या महिंद्रा स्कॉर्पियोची एक्स-शोरूम किंमत 12.77 लाख ते 17.62 लाख रुपयांपर्यंत आहे. या वर्षी सणासुदीच्या काळात कंपनी न्यू जनरेशन स्कॉर्पियो लाँच करू शकते.
Mahindra KUV100 NXT
कंपनी महिंद्राच्या एंट्री लेव्हल एसयूव्ही केयव्ही 100 वर एकूण 41,055 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ऑफर अंतर्गत, या एसयूव्हीवर 38,055 रुपयांची रोख सवलत आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. कंपनीच्या या एसयूव्हीवर कोणताही एक्सचेंज बोनस दिला जात नाही. KUV100 NXT एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख ते 7.84 लाख रुपयांपर्यंत आहे.
Mahindra XUV300
महिंद्रा आपली लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 एकूण 44,000 रुपयांच्या सूटसह विकत आहे. ऑफरद्वारे ऑक्टोबर महिन्यासाठी, XUV300 एसयूव्हीवर 15,000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देऊन ऑफर केली जात आहे. या व्यतिरिक्त, या महिन्यात XUV300 कार खरेदी केल्यावर 5,000 रुपयांचे अतिरिक्त लाभ देखील मिळत आहेत. XUV300 ची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख ते 13.46 लाख रुपयांपर्यंत आहे.
Mahindra Alturas G4
महिंद्रा ऑक्टोबर महिन्यात आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही Alturas G4 वर सर्वाधिक 81,500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Alturas G4 50,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत आणि 20,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभांसह उपलब्ध आहे. महिंद्रा Alturas ची किंमत 28.77 लाख ते 31.77 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
Mahindra Marazzo
महिंद्रा मराझो एमपीव्ही 25,200 रुपयांपर्यंतच्या लाभांसह ऑक्टोबर महिन्यात खरेदी करता येते. कंपनीच्या ऑफर अंतर्गत, 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 5,200 रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदे या कारवर दिले जात आहेत. मराझोची एक्स-शोरूम किंमत 12.42 लाख ते 14.57 लाख रुपयांपर्यंत आहे.
टिप : वाहनांवर मिळणारी सवलत किंवा सूट प्रत्येक शहरानुसार बदलू शकतात. या ऑफर डीलर्सकडून दिल्या जात आहेत. नवीनतम ऑफरच्या अधिक माहितीसाठी, आपल्या शहरातील जवळच्या डीलरशिपला भेट द्या.