Hyundai चा दावा, Ioniq 5 इलेक्ट्रीक कार इतकी देणार पॉवर की फ्रिज, मायक्रोव्हेवही चालेल; पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 11:50 AM2021-04-08T11:50:03+5:302021-04-08T11:54:04+5:30

Hyundai Ioniq 5 : पाहा कारमध्ये कोणते आहेत भन्नाट फीचर्स

प्रमुख कार उत्पादक कंपनी ह्युंदाईनं नुकतीच आपली नवी इलेक्ट्रीक कार Ioniq 5 प्रदर्शित केली. या प्रीमिअम सेडान कारचा ग्लोबल डेब्यू करण्यात आला.

कंपनीच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की कारमधील बॅटरी इतकी पॉवर निर्माण करते की ती मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी उपकरणे, ट्रेड मील आणि फ्रीजसारखी अप्लायन्सेस चालवू शकते.

या कारमदध्ये दुसऱ्या रो मध्ये देण्यात आलेल्या पॉवर सॉकेटमध्ये तुम्ही लॅपटॉपसारखे डिव्हाईस कनेक्ट करू शकता.

तसंच मोठ्या स्पीकर्ससह पोर्टेबल ओव्हन आणि रेफ्रिजरेटरलादेखील चालवता येऊ शकतं.

कंपनीचा दावा आहे की ही कार 3.6 किलोव्हॅट पर्यंत क्षमतेचं इलेक्ट्रीक पॉवर जनरेट करते.

Hyundai चा दावा आहे की ही अशी पहिली कार आहे ज्यात बाय-डायरेक्शनल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करते.

यावरून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कारमधील बॅटरीतून पॉवर देऊ शकते.

सामान्य इलेक्ट्रीक कार्सची बॅटरी केवळ लॅपटॉप आणि मोबाईलसारख्या डिव्हाईसेसना चार्ज करण्याची सुविधा देतात. परंतु यात मिळणाऱ्या सुविधा या अधिक आहेत.

Hyundai Ioniq 5 या कारमध्ये ड्युअल बॅटरीसोबतच रुफवर सोलार पॅनल इन्स्टॉल करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

हा सोलार पॅनल एक्स्ट्रा ड्रायव्हिंग रेंजही देतो. ज्याद्वारे कार वर्षाला १ हजार ३०० किलोमीटरची रेंज कव्हर करू शकते.

कंपनी पुढील काही महिन्यात ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करु शकते.

Hyundai Ioniq 5 चं हे मवं मॉडेल फँकफर्ट मोटर शोमध्ये सादर करण्यात आलेल्या 45 कॉन्सेप्टचं प्रोडक्शन व्हर्जन आहे.

या कारमध्ये कंपनीनं पॉप अप डोअर हँडल्स. रॅक्ड फ्रन्ट विंडशिल्ड. ब्लॅक रुफ, स्लिक LED, हेडलँपसह 20 इंचाचे अलॉय व्हिल्सही दिले आहेत.

या कारसोबत देण्यात आलेला फास्ट चार्जिंगनं 5 मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर कार किमान १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.

तसंच १८ मिनिटांत या कारची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. सिंगल चार्ज मध्ये ही कार 480 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.