Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:57 IST
1 / 8Hyundai Creta Electric : ह्युंडाई मोटर इंडियाने त्यांची प्रसिद्ध इलेक्ट्रिक एसयूव्ही Creta Electric चे 3 नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. यामध्ये एक्सलन्स (42 kWh), एक्झिक्युटिव्ह टेक (42 kWh) आणि एक्झिक्युटिव्ह (O) (51.4 kWh) यांचा समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन व्हेरिएंट आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले आहेत.2 / 8बॅटरी पॅक आणि काही वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, नवीन व्हेरिएंटमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. ह्युंडाईने क्रेटा इलेक्ट्रिकला दोन नवीन रंगांमध्ये आणले आहे. यात मॅट ब्लॅक आणि शॅडो ग्रे या रंगाचा समावेश आहे. 3 / 8Excellence (42 kWh) – लेव्हल 2 ADAS, डॅशकॅम, सराउंड व्ह्यू मॉनिटर, फ्रंट पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रोक्रोमिक मिरर, रिअर वायरलेस चार्जर, इलेक्ट्रिक 8-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट (मेमरी फंक्शनसह), पॅसेंजर सीट अॅडजस्टेबल, लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फोल्डेबल सीटबॅक टेबल, रेन सेन्सिंग वायपर इत्यादी फिचर्स मिळतात.4 / 8Executive Tech (42 kWh) – एक्सलन्स व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, यात व्हॉइस अॅक्टिव्हेटेड पॅनोरॅमिक सनरुफ, इको-लेदर अपहोल्स्ट्री, कूल्ड फ्रंट सीट्स आणि मागील सनशेड समाविष्ट आहेत.5 / 8Executive (O) (51.4 kWh) – एक्झिक्युटिव्ह टेक व्हेरियंट व्यतिरिक्त, यात लांब पल्ल्याची बॅटरी आणि इंटेलिजेंट पॅनोरॅमिक सनरुफ सारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत.6 / 8Hyundai Creta Electric च्या किमती – (एक्झिक्युटिव्ह 18,02,200, एक्झिक्युटिव्हटेक 18,99,900), 42kWh (प्रीमियम 19,99,900, प्रीमियम (एचसी)20,72,900), (एक्सलन्स 21,29,900, एक्सलन्स (एचसी) 22,02,900), 51.4 kWh (एक्झिक्युटिव्ह (O) 19,99,900, स्मार्ट (O) 21,53,100, स्मार्ट (O) (एचसी) 22,26,100), (एक्सलन्स 23,66,600, एक्सीलेंस (एचसी) 24,39,600). नोट: येथे (एचसी) चा अर्थ होम चार्जर आणि (O) चा अर्थ ऑप्शनल आहे. 7 / 8बॅटरी पॅक आणि रेंज- 42 kWh बॅटरी पॅक (एक्सलन्स आणि एक्झिक्युटिव्ह टेक) – 420 किमी रेंज, 51.4 kWh बॅटरी पॅक (एक्झिक्युटिव्ह (O) – 510 किमी रेंज.8 / 8कनेक्टिव्हिटी आणि टेक्नोलॉजी- सर्व व्हेरिएंट्समध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये डॅशकॅम आणि रियर वायरलेस चार्जर उपलब्ध असतील. इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांना अधिक पर्याय प्रदान करण्याचे ह्युंदाईचे उद्दिष्ट आहे.