कार घ्यायची झाली तर तुमच्या खिशातून किती कर घेतला जातो? म्हणून महाग वाटतायत वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:50 IST2025-02-03T15:44:45+5:302025-02-03T15:50:22+5:30

अनेकजण असे असतात की कार फक्त स्टेटससाठी घेतात आणि पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर अशीच धूळ खात उभी करून ठेवतात. अशा अवस्थेतील कारकडे पाहून वाटते या लोकांकडे लक्ष्मी पाणी भरत असावी.

कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतू, ते त्या कारच्या किंमतीवरून, मेन्टेनन्सचा खर्च आणि तिला पोसण्याच्या खर्चामुळे पूर्ण होत नाही. अनेकजण असे असतात की कार फक्त स्टेटससाठी घेतात आणि पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर अशीच धूळ खात उभी करून ठेवतात. अशा अवस्थेतील कारकडे पाहून वाटते या लोकांकडे लक्ष्मी पाणी भरत असावी. कारण या कार घेताना हे लोक जवळपास कारच्या किंमतीच्या निम्मा कर भरत असतात.

हा कर राज्यांनुसार वेगवेगळा असतो. तुम्ही जेव्हा कार घेता तेव्हा सरकार तुमच्या खिशातून तो अप्रत्यक्षपणे काढून घेते. हा किती असतो. ते पाहुया.

ही ती किंमत आहे ज्यावर कार कंपनीकडून डीलरशिपपर्यंत येईपर्यंत लागते. यामध्ये वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन देखील समाविष्ट आहे. ही किंमत कंपनी कर भरूनच तेवढी आकारते.

रोड टॅक्स म्हणजे रस्ता कर राज्य सरकार आकारते. हा कर राज्यानुसार बदलतो.

जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा तुम्हाला नोंदणी शुल्क देखील भरावे लागते. कारच्या प्रकारानुसार आणि तिच्या इंजिन क्षमतेनुसार वेगळे आकारले जाते. ईलेक्ट्रीक वाहनांना सध्या मोफत आहे.

हा कर राज्य सरकार आकारते. हे देखील कराचा प्रकार आणि इंजिन क्षमता पाहून बसवले जाते.

हा कर केंद्र सरकारकडून आकारला जातो. तो कारच्या एक्स-शोरूम किंमतीवर आणि इतर गोष्टींवर असतो. केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा समान वाटा यात असतो.कारवरील जीएसटी १८ टक्के किंवा २८ टक्के असू शकतो.

काही राज्य सरकारे किंवा महानगरपालिका नवीन गाड्यांवर अतिरिक्त शुल्क आकारू शकतात. ते पार्किंग शुल्क किंवा पर्यावरण शुल्काच्या स्वरूपात देखील आकारले जाऊ शकते.

हा एवढा कर भरून कारची किंमत ठरते. म्हणजे जर कारची एक्स शोरुम किंमत १० लाख असेल तर ती कार तुम्हाला हे सर्व कर भरून १५ लाखांना पडते. त्यातही इन्शुरन्स आला. आता हे सर्व ज्याला परवडते तेच या महागड्या गोष्टी घेऊ शकतात