शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतात किती जणांकडे आहे लॅम्बोर्गिनी? एक कार घेण्यासाठी मोजावे लागतात 'इतके' कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:22 IST

1 / 8
कानपूरमधील भीषण अपघातानंतर सुपर लक्झरी कार 'लॅम्बोर्गिनी' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतात किती लोकांकडे ही सुपरकार आहे आणि ती खरेदी करण्यासाठी नेमका किती खर्च येतो, हे जाणून घेऊया.
2 / 8
८ फेब्रुवारी रोजी कानपूरच्या व्हीआयपी रोडवर एका भरधाव लॅम्बोर्गिनीने दिलेल्या धडकेचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांची लॅम्बोर्गिनी जेव्हा रस्त्यावर अनियंत्रित झाली, तेव्हा केवळ आरोपीचीच नाही, तर कारची किंमत आणि तिच्या मालकांच्या विश्वाचीही चर्चा होऊ लागली.
3 / 8
कानपूर लॅम्बोर्गिनी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी शिवम मिश्रा याला अटक केली आहे. ८ फेब्रुवारी रोजी अनियंत्रित लॅम्बोर्गिनीने अनेक लोकांना धडक दिली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, मात्र या घटनेमुळे भारतातील 'सुपरकार कल्चर' पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
4 / 8
विविध रिपोर्ट्सनुसार, २०२६ च्या सुरुवातीपर्यंत भारताच्या रस्त्यांवर साधारणपणे ८०० किंवा त्यापेक्षा जास्त लॅम्बोर्गिनी कार्स आहेत. गेल्या काही वर्षांत या ब्रँडच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे.
5 / 8
कंपनीने २०२४ मध्ये ११३ युनिट्सची विक्री केली, तर २०२५ मध्ये १११ कार्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्या. हे आकडे कंपनीसाठी विक्रमी ठरले आहेत. भारतात लॅम्बोर्गिनीचे 'Urus SUV' हे मॉडेल सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.
6 / 8
'Urus' नंतर 'Huracán' या मॉडेलचा क्रमांक लागतो. Urus च्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे तिचा स्पोर्टी लूक आणि SUV म्हणून असलेली उपयुक्तता. जर तुम्हाला २०२६ मध्ये भारतात नवीन लॅम्बोर्गिनी खरेदी करायची असेल, तर तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४.१८ कोटी ते ४.४७ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
7 / 8
कार खरेदीचा खर्च फक्त एक्स-शोरूम किमतीवर थांबत नाही. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये टॅक्स, रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्च मिळून या कारची ऑन-रोड किंमत ५ कोटी रुपयांच्या पुढे जाते.
8 / 8
भारतात लॅम्बोर्गिनीचे बहुतेक मालक हे मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक आहेत. मात्र, आता तरुण उद्योजकांची संख्याही वाढत आहे. कंपनीच्या मते, भारतीय ग्राहकांचे सरासरी वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान दिसून आले आहे, जे लक्झरी कार सेगमेंटसाठी खूपच कमी मानले जाते.
टॅग्स :Lamborghiniलँबॉर्घिनीIndiaभारत