शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:20 IST

1 / 6
भारतीय बाजारपेठेत हार्ले-डेव्हिडसनने आपली नवी X440T बाइक लॉन्च केली आहे. ही लोकप्रिय X440 चे अधिक स्टायलिश आणि मॉडर्न व्हेरिएंट असून 400cc सेगमेंटमध्ये प्रीमियम पर्याय ठरत आहे. दमदार इंजिन, आकर्षक डिझाइन आणि नवे टेक फीचर्समुळे रायडर्समध्ये या बाइक्सबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
2 / 6
Harley Davidson X440T खास त्या रायडर्ससाठी डिझाइन केली आहे, जे क्लासिक हार्ले लुकसोबत आधुनिक, स्पोर्टी स्टाइल शोधत आहेत. X440 मॉडेलला भारतात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर कंपनीने हे नवीन व्हर्जन आणले आहे. यामध्ये लूक अधिक आकर्षक करण्यात आला आहे, ज्यामुळे ती रस्त्यावर वेगळीच ओळख निर्माण करते.
3 / 6
नवीन व्हेरिएंटमध्ये आधीप्रमाणेच 440cc सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे, जे 27 BHP पॉवर आणि 38 Nm टॉर्क तयार करते. हे इंजिन शहरातील कम्यूट आणि हायवे रायडिंगसाठी स्थिर आणि पॉवरफुल अनुभव देते. 6-स्पीड गिअरबॉक्स राइडला अधिक स्मूथ बनवतो. वजन 192 किलो असले तरी, बाइकची स्टेबिलिटी आणि कंट्रोल उत्कृष्ट आहे.
4 / 6
Harley Davidson X440T मध्ये 400cc श्रेणीला साजेशी अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिली आहेत. यात फुल LED हेडलाइट, TFT डिजिटल डिस्प्ले, राइड-बाय-वायर थ्रॉटल, रेन आणि रोड मोड, स्विचेबल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, 18-इंच अलॉय व्हील, USD फ्रंट फोर्क आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल ABS...हे फीचर्स बाइकला या सेगमेंटमध्ये सर्वाधिक प्रीमियम आणि सुरक्षित पर्याय बनवतात.
5 / 6
कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कोल्जा रेबस्टॉक यांच्या मते, X440 च्या यशामुळे हार्ले-डेव्हिडसनला भारतात नवीन दिशा मिळाली आहे. X440T ही भारतीय तरुण राइडर्सच्या स्टाइल, परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाच्या अपेक्षा लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. यावरुन कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते.
6 / 6
नवीन X440T ची एक्स-शोरूम किंमत ₹2.79 लाख ठेवली आहे. ही किंमत प्रीमियम असूनही वॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरू शकते. या बाइकची स्पर्धा Triumph Speed 400, Bajaj Dominar 400, Royal Enfield Scram 411 आणि KTM Duke 390 शी आहे. तुम्हाला पॉवर + स्टाइल + प्रीमियम ब्रँड + आधुनिक फीचर्स एकाच बाइकमध्ये हवे असेल, तर Harley Davidson X440T 400cc योग्य पर्याय ठरू शकते.
टॅग्स :Harley-Davidsonहार्ले डेव्हिडसनbikeबाईक