सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:56 IST2025-09-11T10:53:00+5:302025-09-11T10:56:30+5:30

केंद्र सरकारने अलीकडेच नवीन जीएसटी सुधारणेला मंजुरी दिली आहे. नव्या नियमानुसार वाहनांवरील जीएसटी दरात मोठे बदल झाले आहेत. चारचाकीसह दुचाकी किंमतीवरील जीएसटी दरातही कपात करण्यात आली आहे.
नव्या जीएसटीमुळे दुचाकीवर कमी कर आकारला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांवरील किंमती कमी केल्या आहेत. त्यात सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या आणि देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हिरो पॅशन प्लसची किंमतही बदलली आहे.
देशातील बहुतांश मध्यमवर्गीयांच्या घरी हिरो पॅशन ही दुचाकी पाहायला मिळते, त्यामुळे नव्या जीएसटी दरामुळे या दुचाकीच्या किंमती किती घसरल्या आहेत याची उत्सुकता अनेकांना आहे. आता हिरो मोटोकॉर्पनेही त्यांच्या प्रसिद्ध हिरो पॅशन प्लसची किंमत कमी केल्याचं घोषित केले आहे.
येत्या दसरा किंवा दिवाळीला जर तुम्ही एखादी दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हिरो पॅशन प्लस ही तुमच्या खिशाला परवडणारी दुचाकी किती किंमतीत मिळेल आणि त्यातून तुमची किती बचत होईल याबाबत जाणून घेऊया.
GST मध्ये काय बदल झाले? - सरकारने चारचाकी आणि दुचाकीवर लागणऱ्या जीएसटी दरात कपात केली आहे. नव्या जीएसटीनुसार, ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असणाऱ्या दुचाकीवर कर कमी झाला आहे. या वाहनांवर आधी २८ टक्के जीएसटी लावला जात होता, तो आता १८ टक्क्यांवर आला आहे.
सरकारने जीएसटी दरात १० टक्क्यांनी कपात केल्यानंतर दुचाकीच्या किंमतीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. जीएसटी कमी झाल्याने वाहन खरेदीची किंमतही कमी झाली आहे. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पनेही दुचाकीची किंमत कमी केली आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत.
आतापर्यंत Hero Passion + या दुचाकीवर सरकारकडून २८ टक्के जीएसटी आकारला जात होता. परंतु कंपनीने नव्या जीएसटी दरातून या दुचाकीच्या किंमतीत ६५०० रूपये कमी करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे ही दुचाकी खरेदी केल्यानंतर तुमचे ६५०० रुपये वाचणार आहेत.
हिरो कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी दुचाकी म्हणजे पॅशन आहे. शहरांपासून गावापर्यंत या दुचाकीला मोठी मागणी आहे. खेड्यापाड्यात बहुतांश लोक हिरो पॅशनला प्राधान्य देतात. आता जीएसटी कपातीनंतर ही दुचाकी खरेदी करणे आणखी फायदेशीर होणार आहे.
Hero Passion Plus या दुचाकीची ऑटो मार्केटमध्ये प्रचंड क्रेझ आहे. इंजिनपासून माइलेज, फिचर्समुळे ही दुचाकी इतर प्रसिद्ध दुचाकींना टक्कर देते. या दुचाकीची एक्स शोरूम किंमत ८१, ६५१ इतकी आहे. मात्र जीएसटी कपातीनंतर यात आणखी घट झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
हिरो पॅशन ही दुचाकी कंपनीच्या दाव्यानुसार ६०-७० किमी माइलेज देते. हायवेवर त्याचे माइलेज जास्त आहे. त्यात कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच, सेमी डिजिटल इस्ट्यूमेंट कंसोलसारखे सुरक्षेसाठी फिचर्स देण्यात आले आहेत.