जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:14 AM2021-10-14T09:14:18+5:302021-10-14T09:23:13+5:30

Datsun Festive Offer : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर सणासुदीच्या कालावधीत कंपन्यांकडून उत्तम ऑफर्स देण्यात येत आहेत.

Datsun India Festive Offers : Datsun India नं आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त फेस्टिव्ह ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी redi-Go, Go आणि Go+ मॉडेल्सवर 40 हजार रूपयांपर्यंतचे बेनिफिट्स ऑफर करत आहे.

कंपनीची ही ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरचा लाभ ग्राहक कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सच्या स्वरूपात घेऊ शकतात. अशातच जर कोणी डॅटसनची कार घेऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

कंपनी आपल्या पॉप्युलर redi-GO वर 40 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स ऑफर देत आहे. यामध्ये 20 हजार रूपयांचा कॅश डिस्काऊंटही सामील आहे. तर डॅटसन गो ग्राहकांना २० हजार रूपयांच्या कॅश आणि एक्स्चेंज बोनसच्या स्वरूपात विकत घेऊ शकता. NIC डिलरशिपद्वारे याचा ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.

डॅटसनच्या रेडी गो या कारमध्ये 14 इंचाच्या व्हिल्ससोबत L शेप डीआरएल, क्रोम ग्रिल आणि स्लिक हेडलँप देण्यात आले आहेत. केबिनमध्ये 8 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टमही देण्यात आली आहे.

या 5 सीटर कारमध्ये सेफ्टीसाठी दोन एअरबॅग्स देण्यात आल्या असून ही हॅचबॅक कार दोन पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येते. या कारची किंमत 3.83 लाखांपासून सुरू होते.

डॅटसन गो या या कारमध्ये 14 इंचाच्या अलॉय व्हिल्ससोबत हॉक आईड हेडलँप्स. क्रोम ग्रिल आणि पॉवर अॅडजेस्टेबल ORVM देण्यात आले आहेत. यामध्ये पॉवर स्टेअरिंग व्हिलसोबत 7 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे.

क्रॅश सेन्सर्स असलेल्या या कारमध्ये 1.2 लीटरचं नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिन देण्यात आलं आहे. या कारची किंमत 4.02 लाख रूपयांपासून सुरू होते.

डॅटसन गो प्लस ही कार MPV 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसोबत येते. यामध्ये कंपनी 14 इंचाचे व्हिल्स, एलईडी डीआरएल, पॉवर अॅन्टिना, क्रोम ग्रिल, मस्क्युलर बॉनेट आणि अॅडजस्टेबल हेडलाईट्स ऑफर करत आहे. या कारमध्ये सात जण प्रवास करू शकतात.

ड्युअल एअरबॅग्स असलेल्या या कारमध्ये इन्फोटन्मेंट सिस्टमसोबत दोन स्पीकर, पॉवर विंडो आणि पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. या कारची किंमत 4.25 लाख रूपयांपासून सुरू होते.