नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 09:54 AM2020-02-18T09:54:56+5:302020-02-18T10:02:14+5:30

लँड रोव्हरने आगामी हॉलिवूडचा बॉन्ड पट No Time to Die ही दृष्ये घेतली आहेत. यातील एका प्रसंगात कारने 30 मीटर लांब उडी मारली आहे.

प्रसिद्ध एसयुव्ही कार निर्माता कंपनी लँड रोव्हरने डिफेंडर नावाची नवीन एसयुव्हीची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये या कारने रोमांचित करणारी सर्व हद्द पार केल्याचे दाखविण्यात आले आहे. फोटोपाहूनच समजून जाल की यामध्ये किती खतरनाक स्टंट करण्यात आले आहेत.

लँड रोव्हरने आगामी हॉलिवूडचा बॉन्ड पट No Time to Die ही दृष्ये घेतली आहेत. यातील एका प्रसंगात कारने 30 मीटर लांब उडी मारली आहे.

याद्वारे Land Rover Defender किती दमदार आहे हे दिसते. या पूर्ण मुव्हीमध्ये एकूण 11 डिफेंडर एसयुव्ही वापरण्यात आल्या होत्या

या फुटेजमध्ये नवी डिफेंडर हवेमध्ये उडविताना दाखविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हीच कार डोंगरदऱ्यांवरून उड्या मारताना, नदी आणि चिखलातून मार्गक्रमण करताना दाखविण्यात आली आहे.

या मुव्हीमध्ये ही कार फूल स्पीडमध्ये चालविण्यात येत असून पुढे जाऊन एसयुव्हीने पलटी मारली आहे. एवढ्यावरच न थांबता ती पुन्हा सरळ झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहताना हा स्टंट जेवढा जबरदस्त वाटतो त्यापेक्षाही तो प्रत्यक्षात साहसी आहे. No Time To Die या बॉन्डपटामध्ये Lee Morrison हे स्टंट कोऑर्डिनेटर आहेत.

त्यांच्यासोबत ऑस्कर विजेते आणि स्पेशल इफेक्ट अॅक्शन व्हेईकल सुपरवायझर क्रिस कॉर्बोल्ड हे आहेत.

हे स्टंट कोणत्या धाडसी पुरुषाने केलेले नाहीत, तर ते एका जेसिका हॉकिन्स या महिला चालकाने केले आहेत.

जेसिका ही Formula 3 W ची ड्रायव्हर आहे. तिची निवड मॉरिसन यांनी रेस पाहूनच केली होती.