संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:24 IST
1 / 7केंद्र आणि राज्य सरकारांनी ईलेक्ट्रीक वाहनांवरील सबसिडी कमी केली आहे. यामुळे ईव्ही कारचा म्हणावा तसा सेल होत नाहीय. टाटा, महिंद्रा आणि एमजीच्या कार काही हजारांत विकल्या जात आहेत. अशातच या कार कंपन्यांनी आपल्या ईव्ही कारवर जोरदार डिस्काऊंट देऊ केले आहेत. 2 / 7फेस्टीव्ह सीझन आला आहे. यामुळे कंपन्यांनी आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १० लाखांपर्यंतची सूट देऊ केली आहे. कोणकोणत्या कारवर हा डिस्काऊंट मिळत आहे, चला पाहुया...3 / 7Kia ने काही वर्षांपूर्वी प्रीमियम इलेक्ट्रिक कारवर Kia EV6 लाँच केली होती. तिच्यावर सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. कंपनी या मॉडेलवर १० लाखांपर्यंतची सूट देत आहे. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर ६६३ किमी पर्यंतची रेंज देते. 4 / 7महिंद्रा XUV400 या कारवर कंपनी २.५ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर ४५० किमी पर्यंतची रेंज देते.5 / 7एमजी मोटर तिच्या झेडएस ईव्ही कारवर २.५ लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. ही कार एका पूर्ण चार्जमध्ये ४६१ किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. 6 / 7सिट्रोएन कंपनीची एकमेव ईलेक्ट्रीक कार सीई ३ ईव्हीवर १ लाख २५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. एका चार्जवर ही कार २२० किमी आरामात जाऊ शकते. 7 / 7 ह्युंदाईची सर्वाधिक पसंतीची कार क्रेटा कंपनीने इलेक्ट्रीकमध्ये आणली खरी परंतू तिला प्रतिसादच मिळत नाहीय. या कारवर तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंचा डिस्काऊंट मिळू शकतो. डीलरसोबत आणखी घासाघिस केली तर तुम्हाला या डिस्काऊंटपेक्षाही जास्त फायदा होऊ शकतो.