शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दैनंदिन वापरासाठी बेस्ट EV बाइक्स; किंमत फक्त ₹74,999 पासून सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:49 IST

1 / 7
Electric Bikes: भारतात पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक बाइक्सकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक बाइक्स केवळ स्वस्त आणि पर्यावरणपूरक नाहीत, तर त्यांची राइडिंग स्मूद आणि मेंटेनन्सही अतिशय कमी आहे. शहरांमध्ये रोजच्या प्रवासासाठी या बाइक्स अत्यंत किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय ठरत आहेत. जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रिक बाइकच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
2 / 7
Ola Roadster X- Ola ची Roadster X ही कंपनीची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक बाइक आहे, जी खास अर्बन कम्यूटर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2.5 kWh ची बॅटरी देण्यात आली असून, तिची किंमत फक्त ₹74,999 आहे. त्यामुळे ही बाईक सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक मानली जाते.
3 / 7
IDC (Indian Driving Conditions) प्रमाणे या बाइकची रेंज 252 किमी आहे, परंतु प्रत्यक्षात ती 150 किमी सहज चालते. 0 ते 80% चार्ज होण्यासाठी बाईकला केवळ 3 ते 4 तास लागतात. फीचर्समध्ये MoveOS 5 वर आधारित 4.3 इंच LCD डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), जिओ-फेन्सिंग, आणि थेफ्ट अलर्ट सारख्या आधुनिक सुविधा मिळतात.
4 / 7
Oben Rorr EZ- Oben Rorr EZ ही लुक आणि परफॉर्मन्स या दोन्ही बाबतीत प्रीमियम बाइक आहे. तिच्या बेस व्हेरिएंटमध्ये 2.6 kWh LFP बॅटरी असून किंमत ₹89,999 पासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट (4.4 kWh) ची किंमत ₹1,19,999 पर्यंत जाते. यात LFP (Lithium Ferrous Phosphate) टेक्नॉलॉजीवर आधारित बॅटरी आहे.
5 / 7
IDC नुसार टॉप व्हेरिएंटची रेंज 175 किमी आणि रिअल कंडिशनमध्ये सुमारे 140 किमी आहे. यात 7.5 kW मोटर दिली आहे, जी 277 Nm टॉर्क निर्माण करते आणि याची टॉप स्पीड 95 किमी/तास आहे. बाइक मध्ये तीन राइडिंग मोड्स इको, सिटी आणि स्पोर्ट आहेत.
6 / 7
Matter Erra- Matter Erra ही अहमदाबादस्थित Matter Motors कंपनीची निर्मिती आहे. 2025 मध्ये अपडेट झालेली ही भारतातील पहिली गियर्ड इलेक्ट्रिक बाइक आहे. बेस व्हेरिएंट (Erra 5000) ची किंमत ₹1,81,308, तर टॉप व्हेरिएंट (Erra 5000+) ची किंमत ₹1,93,826 आहे. किंमत जरी जास्त असली तरी तिचा 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तिला खास बनवतो.
7 / 7
इंजिनऐवजी इलेक्ट्रिक मोटरसह गिअरबॉक्सचा कॉम्बिनेशन देऊन ही बाइक पारंपरिक पेट्रोल बाइक्ससारखा अनुभव देते. IDC नुसार तिची रेंज 125 ते 172 किमी, आणि टॉप स्पीड 100 किमी/तासाहून अधिक आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन