ही बाईक धावत नाही, उडते; पण किंमत ऐकून तुम्हीही उडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 14:22 IST2018-06-20T14:22:12+5:302018-06-20T14:22:12+5:30

दुकाटीनं मल्टीस्ट्रेडा 1260 ही फ्लॅगशिप बाईक भारतीय बाजारात दाखल केली आहे. 1260 सीसीच्या या बाईकची किंमत 15.99 लाख इतकी आहे.
दुकाटीनं मल्टीस्ट्रेडा 1260 सोबतच मल्टीस्ट्रेडा 1260 एस ही बाईकदेखील लॉन्च केली आहे. तिची किंमत 18.06 लाख रुपये आहे.
मल्टीस्ट्रेडा 1260 एस ही मल्टीस्ट्रेडा रेंजमधील सर्वात शक्तिशाली बाईक आहे. यामध्ये 1260 सीसी एल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे.
दुकाटीनं मल्टीस्ट्रेडा 1260 चं इंजिन 158 बीएचपी पीक पावर आणि 129.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनमध्ये 6 स्पीडचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
मल्टीस्ट्रेडा 1260 मध्ये इलेक्ट्रॉनिक पॅकेजसह ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ABS, कॉर्नरिंग ABS देण्यात आलं आहे.
मल्टीस्ट्रेडा 1260 मध्ये दुकाटीच्या मल्टीमीडिया सिस्टिमसह कलर TFT डिस्प्ले, कॉर्नरिंग लॅप्स, इलेक्ट्रॉनिक शाइहुक सस्पेंशन आणि क्विकशॉफ्टर आहे.