भारतात फेल झालेल्या कंपनीच्या कारमधून डोनाल्ड ट्रम्प फिरतात; ताफ्यातही घेऊन मिरवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 09:59 AM2020-02-26T09:59:19+5:302020-02-26T10:12:46+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा महत्वाची आहे. यामुळे ट्रम्प यांची कार एवढी मजबूत आणि दणकट आहे की रासायनीक हल्लाही ती परतवून लावू शकते. शिवाय तिचे टायर जरी पंक्चर झाले तरीही ती कार 100 च्या वेगाने धावू शकते. या कारचे दरवाजेच विमानाच्या दरवाजाच्या वजनाचे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत दोन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये त्यांचे विमान आणि त्यांची दी बीस्ट ही अभेद्य कार चर्चेत होती. मात्र, त्यांच्या ताफ्यातील कार पाहिल्यास ही कंपनी भारतात सपशेल अपयशी पडलेली आहे.

ट्रम्प यांची सुरक्षा महत्वाची आहे. यामुळे ट्रम्प यांची कार एवढी मजबूत आणि दणकट आहे की रासायनीक हल्लाही ती परतवून लावू शकते. शिवाय तिचे टायर जरी पंक्चर झाले तरीही ती कार 100 च्या वेगाने धावू शकते. या कारचे दरवाजेच विमानाच्या दरवाजाच्या वजनाचे आहेत.

मायलेज फक्त विचारू नका, कारण एवढ्या वजनाची आणि ताकदीची कार काय मायलेज देणार हा प्रश्नच आहे. पण या कारमध्ये सर्व सुविधा आणि एकापेक्षा एक खतरनाक शस्त्रे आहेत एवढे मात्र खरे.

ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये त्यांची कॅडीलॅकसह शेवरले या कंपनीच्या कारच जास्त आहेत. मात्र, ही जनरल मोटर्सची ब्रँड असलेली कार कंपनी भारतात सपशेल फेल ठरली आहे. वर्षाला हजारही कार विकल्या जात नव्हत्या. यामुळे कंटाळून कंपनीने भारतीय बाजारपेठ एकदा नाही तर दुसऱ्यांदा सोडली ती ही कायमची.

एवढी मोठी नामुष्की ओढवलेल्या या अमेरिकन कंपनीच्या कार चक्क अमेरिकेचे राष्ट्रपती घेऊन फिरतात. असे आहे तरी काय त्या कारमध्ये?

तुमच्या माहितीसाठी जनरल मोटर्स ही कंपनी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे महत्व एवढे का आहे ते तुमच्या आता लक्षात येईल. ट्रम्प यांची जी अभेद्य दी बीस्ट ही कार आहे ना, ती कॅडिलॅक कार जनरल मोटर्स हीच कंपनी बनविते.

या कंपनीच्या भात्यामध्ये CHEVROLET, BUICK, GMC, CADILLAC, HOLDEN, BAOJUN, WULING हे ब्रँड आहेत.

भलेही शेवरले ही कंपनी भारतात फेल झाली असली तरीही ट्रम्प यांच्या ताफ्यात याच कंपनीच्या कार महत्वाच्या भुमिकेत आहेत. अहमदाबादमध्येही Chevrolet च्या कार आणल्या होत्या.

सीएए या कारना हॉक आय नावाने संबोधते. या कार खास राष्ट्राध्यक्षांसाठी कस्टमाईज केलेल्या असतात. हा गाड्या हल्ल्यावेळी प्रत्यूत्तर देण्यासाठी बनविल्या जातात. या कारमध्येही संहारक शस्त्रे असतात.

शेवरलेचे दुसरे नाव शेवी देखील आहे. ही कंपनी 1911 मध्ये लुईस शेवरले आणि जनरल मोटर्सचे फाऊंडर विलिअम सी डुरंट यांनी स्थापन केली होती. जी नंतर 1918 मध्ये जनरल मोटर्सने विकत घेतली.

लुईस रेसिंग कार ड्रायव्हर होते. 2005 मध्ये शेवरले युरोपमध्ये पुन्हा रिलॉन्च केले. शेवरले जगभारात एसयुव्ही, ट्रक विकते. शेवरले हा फ्रान्समधील एका समाजाचे नाव आहे जे घोडे पालन करतात.