By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:12 IST
1 / 7भारतीय बाजारात पुनरागमनाची तयारी करत असलेल्या Renault साठी सध्याचा काळ विशेष मानला जात आहे. एकीकडे कंपनी नव्या डस्टर SUV मुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे ट्रायबर या किफायतशीर 7-सीटर एमपीव्हीने विक्रीत मोठे यश मिळवले आहे. कमी किंमत, कुटुंबासाठी अनुकूल डिझाइन आणि जास्त आसनक्षमता यामुळे ट्रायबरने भारतीय ग्राहकांमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे.2 / 7रेनोने ट्रायबर ही कार प्रथम 2019 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केली होती. सुमारे सहा वर्षांनंतर, गेल्या वर्षी जुलै 2025 मध्ये या लोकप्रिय एमपीव्हीचा फेसलिफ्ट अवतार लाँच करण्यात आला. त्यानंतर लागू झालेल्या GST रिफॉर्म 2.0 मुळे ट्रायबरच्या किमतीत मोठी कपात झाली आणि ही कार अधिक किफायतशीर ठरली. याचा थेट परिणाम विक्रीवर दिसून आला आहे. 3 / 7रेनोने गेल्या वर्षी जुलैमध्ये ट्रायबरचे नवे फेसलिफ्ट मॉडेल आणले होते. लॉन्चवेळी या 7-सीटर कारची प्रारंभिक किंमत 6.30 लाख रुपये होती. मात्र, GST 2.0 लागू झाल्यानंतर ही किंमत 5.76 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. किंमत घटल्याचा थेट फायदा विक्रीवर झाला असून, आतापर्यंत ट्रायबरच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.4 / 7ऑगस्ट 2019 मध्ये लाँच झालेली ट्रायबर गेल्या साडेसहा वर्षांपासून रेनो इंडियासाठी बेस्ट परफॉर्मर ठरली आहे. हॅचबॅकसारख्या किमतीत एमपीव्हीची सुविधा देणारी ही कार कुटुंबीय ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी 2026 अखेर भारतात 2,00,253 युनिट्सची विक्री झाली असून, डिसेंबर 2025 पर्यंत 34,238 युनिट्सचे निर्यात करण्यात आले आहे.5 / 723 जुलै 2025 रोजी लॉन्च झालेल्या नव्या ट्रायबरमध्ये सहा वर्षांनंतर पहिले मोठे अपडेट देण्यात आले. नव्या मॉडेलमध्ये पूर्णपणे बदललेला फ्रंट लूक, नवे हेडलॅम्प्स आणि LED DRLs, स्लिम ग्लॉस ब्लॅक ग्रिल, नवा डायमंड लोगो यामुळे कार अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसते.6 / 7नव्या Renault Triber मध्ये 1.0 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 72 बीएचपी पॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि AMT अशा दोन्ही पर्यायांमध्ये मिळते. विशेष म्हणजे, याचे मायलेजही सुधारले असून, सध्या 19.59 ते 19.76 किमी/लिटर इतके आहे. याशिवाय, डीलर-लेव्हलवर फिट होणारा CNG किटचा पर्याय उपलब्ध असून, त्यावर फॅक्टरी वॉरंटी दिली जाते.7 / 7कारच्या केबिनमध्ये नव्या लोगोचे स्टीयरिंग व्हील, ब्लॅक-ग्रे अपहोल्स्ट्री, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट) मिळते. फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, यात क्रूझ कंट्रोल, ऑटो वायपर, ऑटो हेडलॅम्प, ऑटो फोल्ड ORVMs, इतर आधुनिक सुविधा मिळतात. सेफ्टीच्या बाबतीत ट्रायबरमध्ये स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्स, ABS + EBD, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि इतर आवश्यक सुरक्षा प्रणाली मिळतात.