लॉकडाऊननंतर तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:15 PM2020-04-14T14:15:36+5:302020-04-15T19:19:43+5:30

पुढील महिन्यापर्यंत लॉकडाऊन असल्याने तुमची कार एकाच जागी उभी असणार आहे. कडक उन्हाळा, धूळ यामुळे गाडीचा मेन्टेनन्सही वाढण्याची शक्यता आहे.

सर्वात आधी कारची बॅटरी उतरू न देणे. यासाठी कारच्या हेडलाईट बंद केलेल्या आहेत का याची चाचपणी करा. चावी लावलेली नाही ना याचीही खात्री करा. तसेच अन्य अॅक्सेसरीज जसे की, मोबाईल चार्जर डिस्कनेक्ट करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे जवळपास सलग 40 दिवस लोकांना घरातच रहावे लागणार आहे.

म्हणजेच तुमचे वाहन, कार तुम्ही बाहेर नेऊ शकणार नाहीत. हे खूप धोक्याचे आहे. कोरोनापासून सावध राहताना वाहनाचीही या काळात काळजी घेणे गरजेचे आहे.

पुढील महिन्यापर्यंत लॉकडाऊन असल्याने तुमची कार एकाच जागी उभी असणार आहे. कडक उन्हाळा, धूळ यामुळे गाडीचा मेन्टेनन्सही वाढण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर मे महिन्याची सुटी असल्याने सहाजिकच लोक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे या कारची काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

इमारतीखाली कव्हर्ड पार्किंग असेल तर ठीक नाहीतर कारवर कापडी कव्हर टाकून झाकून ठेवा.

तुमच्या कारचा एसी रिसक्युलेशन मोडवर ठेवा आणि एसीचे बटन बंद करा.

मोठ्या काळासाठी कार एकाच जागी असल्याने हँड ब्रेक लावू नका. त्या ऐवजी टायर स्ट़ॉपर्स किंवा लाकडी ठोकळ्यांचा वापर करावा.

उन्हामुळे काच खूप तापते. यामुळे वायपरवरील रबरचे ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. यासाठी वायपर वर उचलून ठेवा.

दर आठवड्याभराने कार थोडी मागे-पुढे करावी. अन्यथा कारच्या टायरना फ्लॅट स्पॉट पडतील. जे तुमचे मायलेज आणि टायरच्या झीजेबरोबर जीवही धोक्यात घालू शकतात.

तीन दिवसांतून एकदा कार सुरु करून इंजिन किमान १५ मिनिटांसाठी सुरु ठेवा. जोखमीच्या जागी असाल तर हे करणे धोक्याचे ठरेल.