मारुती सुझुकीच्या 'या' मॉडेल्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, बचतीसह होईल फायदा, जाणून घ्या ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:08 PM2023-05-07T14:08:19+5:302023-05-07T14:25:34+5:30

Discount on Maruti Car : तुम्ही या महिन्यात मारुती एरिनामधून कार खरेदी केल्यास तुम्हाला 60,000 पर्यंतचा फायदा मिळू शकतो.

नवी दिल्ली : जर तुम्ही मारुती सुझुकी कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मोठी सूट हवी असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. एरिना डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या मॉडेलसाठी मारुतीने ऑफर जारी केली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात मारुती एरिनामधून कार खरेदी केल्यास तुम्हाला 60,000 पर्यंतचा फायदा मिळू शकतो.

विशेष बाब म्हणजे कंपनी ग्राहकांना ऑफरसोबत एक्सचेंज बोनसचाही लाभ देत आहे. एक्स्चेंज बोनसचा लाभ 7 वर्षांपेक्षा जुन्या कार आणि यापेक्षा जुन्या वाहनांसाठी वेगवेगळा आहे. ही ऑफर ऑल्टो, एस-प्रेसो, वॅगनआर, सेलेरिओ, स्विफ्ट आणि डिझायर कारवर उपलब्ध असणार आहे.

मारुती सुझुकी आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा आणि अर्टिगावर कोणतीही सूट देत नाही आहे. हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार, कंपनी ऑल्टो K10 च्या एमटी पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण 70 हजारांचा डिस्काउंट देत आहे.

ऑल्टो एमटी सीएनजी व्हेरिएंटवर 50,000 चा डिस्काउंट उपलब्ध आहे. मारुती सुझुकी एस प्रसो एमटी पेट्रोल व्हेरिएंटवर 55,000 आणि एस-प्रसो सीएनजीवर 45,000 ची सूट देत आहे. तसेच, ग्राहक एस प्रेसो एएमटीवर 30,000 रुपयांचा लाभ घेऊ शकतात.

मारुती वॅगनआर 1.0 एमटीवर 65,000, वॅगनआर 1.0 सीएनजीवर 60,000, वॅगनआर 1.2 एमटी पेट्रोलवर 60 हजार आणि वॅगनआर एटीएमवर 35,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

मारुती सुझुकी सेलेरिओ एमटीवर 65,000 रुपये, सेलेरिओ एमटी सीएनजीवर 50,000 रुपये आणि सेलेरिओ एएमटीवर 30,000 रुपयांची बचत होईल.

मारुती सुझुकीला स्विफ्ट एएमटीवर 40,000 रुपये, स्विफ्ट (Vxi, Zxi, Zxi+) पेट्रोल एमटीवर 65,000 रुपये आणि स्विफ्ट सीएनजीवर 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 20,000 डिझायर पेट्रोलवर उपलब्ध आहे.