शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EV कार मेकर BYD ने आणली अनोखी कार; पाण्यावर धावणार, फुल चार्जमध्ये 1000km रेंज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 2:39 PM

1 / 9
BYD YangWang U8: इलेक्ट्रिक कार मेकर कंपनी BYD ने एक नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे. ही SUV कंपनीच्या प्रीमियम ब्रँड YangWang अंतर्गत लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे नाव YangWang U8 आहे. या कारची खास गोष्ठ म्हणजे, ही कार ऑफरोडींगसोबतच पाण्यातही धावू शकते.
2 / 9
तुम्हाला हा विनोद वाटेल, पण हा विनोद नसून खरे सत्य आहे. या कारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ही कार फक्त रस्त्यावरच नाही तर पाण्यातही वेगाने धावते.
3 / 9
या कारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, सर्व दरवाजे सीलबंद राहतील, जेणेकरून गाडीच्या आत पाणी येऊ नये. ही SUV पाण्याच्या पृष्ठभागावर 30 मिनिटे आणि सुमारे 3 किलोमीटर तरंगण्यास सक्षम आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन हे फिचर तयार करण्यात आले आहे.
4 / 9
YangWang U8 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. या कारबाबत कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 1 मीटर ते 1.4 मीटर पाण्यात न बुडता धावू शकते.
5 / 9
या कारच्या बाजूला कॅमेरे देण्यात आले आहेत, जे तुम्हाला कारच्या आत बसवलेल्या डिस्प्लेवर प्रत्येक क्षणाचे अपडेट देत राहतील. कंपनीने या कारमध्ये प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञानासह चार इलेक्ट्रिक मोटर्स बसवल्या आहेत, ज्या एकत्रितपणे 1180hp ची पॉवर निर्माण करतात.
6 / 9
या कारमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. या कारमध्ये 2.0 लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन असेल. या कारमध्ये 75 लीटरची इंधन टाकी देखील आहे.
7 / 9
49kWh क्षमतेची बॅटरीदेखील यात बसवण्यात आली आहे. या कारला 30 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 18 मिनिटे लागतात. कंपनीचा दावा आहे की, ही कार पूर्ण चार्जमध्ये 1000 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
8 / 9
या SUV मध्ये हाय रिझोल्युशन डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 22 स्पीकर सेटअप, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि लेदर सीट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
9 / 9
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक SUV ची किंमत 1.5 लाख डॉलर (जवळपास 1 कोटी 24 लाख रुपये) आहे. हे वाहन भारतात कधी आणले जाईल किंवा इतर बाजारपेठेत कधी आणले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारAutomobileवाहन