उत्तम मायलेज देणारी कार घेण्याचा विचार करताय? हे आहेत सर्वोत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:01 PM2019-05-28T16:01:21+5:302019-05-28T16:04:43+5:30

टाटा मोटर्सची टिगॉर ही कॉम्पॅक्ट सेडान कार मायलेजच्या बाबतीत उत्तम समजली जाते. डिझेल इंजिन असलेली टिगॉर प्रती लिटरमागे 27 किलोमीटरचा अ‍ॅव्हरेज देते. तर पेट्रोल इंजिन असलेली टिगॉर लिटरमागे 24 किलोमीटर इतका अ‍ॅव्हरेज देते. या कारची किंमत 6.34 लाख रुपये इतकी आहे.

टाटा मोटर्सची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमधील टाटा टियागो डिझेल आणि पेट्रोल इंजिन अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. यातील डिझेल इंजिन मॉडेल 27 किलोमीटर, तर पेट्रोल मॉडेल 24 किलोमीटर इतका अ‍ॅव्हरेज देतं.

होंडाची प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील जॅझदेखील उत्तम अ‍ॅव्हरेज देते. जॅझचं डिझेल मॉडेल 27, तर पेट्रोल मॉडेल 18 किलोमीटरचा अ‍ॅव्हरेज देतं. या कारची किंमत 8.12 लाखांपासून सुरू होते.

प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील मारुती सुझूकीची बलेनोच्या डिझेल मॉडेलचा मायलेज 27.39 किलोमीटर आहे. तर बलेनोचं पेट्रोल मॉडेल 23.87 चा अ‍ॅव्हरेज देतं. या कारची किंमत 6.74 लाखांपासून सुरू होते.

सब कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील होंडाची अमेजदेखील चांगला मायलेज देते. अमेजचं डिझेल मॉडेल 27.4 किलोमीटरचा अ‍ॅव्हरेज देतं. तर पेट्रोल मॉडेल लिटरमागे 19.5 चा अ‍ॅव्हरेज देतं. या कारची किंमत 6.98 लाख रुपयांपासून सुरू होते.

प्रीमियम सेडान सेगमेंटमधील मारुती सुझूकीची सियाजदेखील उत्तम अ‍ॅव्हरेज देते. सियाजचं डिझेल मॉडेल 28 चा, तर पेट्रोल मॉडेल 21.56 चा मायलेज देतं. या कारची किंमत 9.20 लाखांपासून सुरू होते.

2018 मध्ये देशात सर्वाधिक विकली गेलेली मारुती डिझायर सब कॉम्पॅक्ट सिडेन सेगमेंटमध्ये येते. डिझायरचं डिझेल मॉडेल 28.40 किलोमीटरचा, तर पेट्रोल मॉडेल 22 किलोमीटरचा अ‍ॅव्हरेज देतं. या कारची किंमत 6.68 लाखांपासून सुरू होते.