लवकरच येणार Bajaj ची दमदार डोमिनर बाइक, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:09 IST2018-09-25T15:02:01+5:302018-09-25T15:09:26+5:30

बजार डोमिनर फेसलिफ्टच्या लूकमध्ये दोन प्रमुख बदल बघायला मिळणार आहेत. यात नवीन अपसाइड-डाऊन फ्रन्ट फोर्क आणि रिवाइज्ड ट्विन चॅनल एग्झॉस्टचा समावेश आहे. त्यासोबतच यात ट्विन-टोन पेंट फिनिश सुद्धा बघायला मिळणार आहे. (सर्व फोटो सध्याच्या मॉडेलचे आहेत)
बजाज डोमिनर फेसलिफ्ट भारतात स्टेज ४ (बीएस ४) इमिशन नॉर्म्ससोबत येण्याची शक्यता आहे.
Facelifted Dominar 400 सुद्धा एबीएस-ओन्ली व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाणार आहे. कारण भारतात सर्वच 125cc+ मोटारसायकलमध्ये एबीएस अनिवार्य करण्यात आलं आहे.
डोमिनरच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्येही 373-cc, फोर-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर इंजिन बघायला मिळेल. हे इंजिन 35 Bhp ची पॉवर आणि 35 Nm टॉर्क जनरेट करतं. यात ६ स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच दिला गेला आहे.
नव्या बाइकमध्ये फूल एलइडी हेडलाइट, एलइडी इंडिकेटर्स आणि एलइडी टेल लाइट असणार आहेत. याक स्प्लिट इन्स्ट्रूमेंट कंसोलही मिळणार आहे.
बजाज नवीन डोमिनरच्या लॉन्चिंगने डोमिनारच्या सध्याचं व्हर्जन रिप्लेस करणार आहे. यासोबतच कंपनी लवकरच या बाइकसोबत टूरिंग अॅक्सेसरीजची रेंजही सादर करु शकते.