शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:16 IST

1 / 10
एअर इंडियाच्या विमान अपघाताने आता अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इंजिन अचानक बंद झाल्याने उड्डाण केलेले विमान कोसळले आहे. आता याचे बालट बोईंग कंपनीला वाचविण्यासाठी एअर इंडियाच्या पायलटवर टाकले जात आहे. बोईंगच्या या विमानांत समस्याच समस्या आहेत. इंजिन आणि फ्युअल स्विच यांच्यावरच आता सर्व तपास अवलंबून आहे. अशातच या इंजिनांचे आयुष्य किती असते असा सवाल उपस्थित होत आहे.
2 / 10
विमानाच्या इंजिनाची एक निश्चित एक्सपायरी डेट नसते. इतर वाहनांप्रमाणेच विमानाच्या इंजिनाचाही मेन्टेनन्स वेळोवेळी करायचा असतो. त्यावर त्याचे आयुष्य किती ते ठरते. परंतू, अनेकदा इंजिनाचा मेन्टेनन्स ठेवूनही ही इंजिन ब्लॉक होतात. एअर इंडियाच्या या विमानाचे इंजिन असेच काही महिन्यांपूर्वी बदलण्यात आले होते.
3 / 10
विमान इंजिन हे कोणत्याही विमानाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जेट इंजिन किंवा टर्बोफॅन इंजिन नावाची ही इंजिन विमानाला उड्डाणासाठी शक्ती देतात. यालाच थ्रस्ट असे म्हणतात. जो एअर इंडियाच्या वैमानिकाने मेडे संदेशावेळी विमानतळावरील यंत्रणांना सांगितलेला.
4 / 10
रोल्स-रॉइस, जनरल इलेक्ट्रिक (जीई), प्रॅट अँड व्हिटनी आणि सीएफएम इंटरनॅशनल या कंपन्या विमानांची इंजिने बनवितात. विमानांच्या इंजिनांचे आयुष्य एका ठराविक मापदंडाद्वारे ठरविले जाते.
5 / 10
यामध्ये फ्लाईट सायकल आणि विमानाचा प्रवास किती झाला यावरून ठरविले जाते. फ्लाईट सायकल म्हणजे एकदा विमानाने उड्डाण केले आणि उतरले ते. तर विमानाचा प्रवास हा किमीमध्ये नाहीत तासात मोजला जातो.
6 / 10
आपली वाहने जशी १००००, १५००० किमीनंतर सर्व्हिस केली जातात, तसेच या कंपन्यांनी निश्चित केलेल्या फ्लाईट सायकलनंतर विमानांच्या इंजिनांची सर्व्हिसिंग केली जाते.
7 / 10
रोल्स-रॉयस, जीई या विमान कंपन्यांनुसार त्यांनी बनविलेली इंजिन ही २० हजार ते ५० हजार उड्डाणाचे तास किंवा १० ते २० हजार फ्लाईट सायकल एवढी विना सर्व्हिस, बिनदिक्कत वापरता येतात.
8 / 10
म्हणजेच एअर इंडियासारख्या कंपन्यांसाठी हा काळ १० वर्षे असू शकतो. एअर इंडियाच्या विमानात बोईंग कंपनीने CFM56 हे इंजिन वापरले होते, जे जगातील सर्वात विश्वासार्ह इंजिन मानले जाते.
9 / 10
हे इंजिन लष्करी विमानांना देखील वापरले जाते. बोईंगच नाही तर एअरबस कंपनीही ही इंजिने वापरते. हे इंजिन रिलाएबल, इंधन वाचविणारे आणि कोणत्याही विमानाला वापरता येणारे असे आहे.
10 / 10
विमान कंपन्या जरी एवढी लाईफ सांगत असल्या तरी देखील विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना इंजिनाची तपासणी वेळोवेळी करणे त्या त्या देशांच्या नियमांनुसार बंधनकारक असते. यामुळे विमानातील प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित केली जाते.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमान