शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

270Km रेंज अन् 36 मिनिटांत चार्ज! 20 लोकच खरेदी करू शकतील 'ही' जबरदस्त EV कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 4:07 PM

1 / 5
Electric Mini Cooper: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच अनेक ऑटोमेकर्स EV सेगमेंटमध्ये उतरत आहेत. Mini India ने त्यांच्या प्रसिद्ध Cooper SE चे नवीन इलेक्ट्रिक व्हर्जन (चार्ज्ड एडिशन) लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेली ही छोटी कार अनेक अर्थांनी खास आहे. कंपनीने याला लिमिटेड एडिशन मॉडेल म्हणून बाजारात लॉन्च केले आहे. कंपनी या कारचे फक्त 20 युनिट्स विकणार आहे.
2 / 5
मिनी कूपर SE EV: कंपनी Cooper SE चे नवीन इलेक्ट्रिक चार्ज्ड एडिशन भारतीय बाजारात कंप्लीट बिल्ट युनिट (CBU) म्हणून आणत असून, याचे फक्त 20 युनिट्स विकल्या जातील. या इलेक्ट्रिक कारची किंमत 55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही नियमित मॉडेलपेक्षा सुमारे 1.5 लाख रुपये अधिक आहे. कंपनीने हे नवीन मॉडेल चिली रेड कलरमध्ये आणले असून, याचे रुफ, विंग मिरर, हँडल्स पांढर्‍या रंगाचे आहेत. याशिवाय बोनेटवर मॅट रेड पट्टीही दिसते.
3 / 5
कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये 32.6kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. कारची इलेक्ट्रिक मोटर 184hp पॉवर आणि 270Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, या कारला ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग घेण्यासाठी फक्त 7.3 सेकंद लागतात. विशेष म्हणजे, या कारचा टॉप स्पीड 150 किमी/तास आहे. या कारला 17-इंच अलॉय व्हील्स दिले आहेत.
4 / 5
ही कार सिंगल चार्जवर तब्बल 270 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. विशेष म्हणजे, ही कार 50kW DC फास्ट चार्जर फक्त 36 मिनिटांत 80% पर्यंत बॅटरी चार्ज करते. तसेच, 2.3 kW क्षमतेच्या चार्जरने कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 9 तास 43 मिनिटे लागतात. कंपनी या कारसोबत 11kW चे वॉल चार्जर देत आहे.
5 / 5
या कारच्या केबिनमध्ये ऑल-ब्लॅक थीम आहे. काही भागांवर पिवळा रंद देण्यात आला आहे. यामुळे केबिनला एक स्पोर्टी लूक मिळतो. यात 8.8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 5.5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. रेग्युलर मॉडेल प्रमाणेच, याला एक गोलाकार युनिट मिळते ज्यामध्ये अनेक कंट्रोल बटणे दिली गेली आहेत. बाजारात या कारचा थेट प्रतिस्पर्धी नाही, परंतु किंमतीच्या ब्रॅकेटनुसार, ही इलेक्ट्रिक कार Volvo XC40 Recharge सारख्या मॉडेलशी स्पर्धा करते.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMiniमिनीAutomobileवाहनIndiaभारत