अकोला बंद : मोर्चा, रास्तारोको व दगडफेकीच्या घटना By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 8:20 PM
1 / 25 कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आठवले गट शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 2 / 25 शहरातील वाशिम रोड बायपासस्थित पक्षाच्या कार्यालयापासून निघालेला मोर्चा मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. 3 / 25 मोर्चात रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 4 / 25 शेकडो युवकांनी मोटारसायकल मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. 5 / 25 अशोक वाटिका या ठिकाणी हजारो युवक, महिला व पुरुष गोळा झाले. चौकात आल्यावर या ठिकाणी युवकांनी नारेबाजी केली 6 / 25 अशोक वाटिका येथे जमलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. 7 / 25 आंदोलकांनी खदान परिसरातील एटीएम फोडले. 8 / 25 आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. 9 / 25 आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. 10 / 25 तुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. 11 / 25 तुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. 12 / 25 आंदोलकांनी बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. 13 / 25 संतप्त अनुयायांनी दुपारी अशोक वाटिका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करून आपल्या रोष व्यक्त केला. 14 / 25 बंद मुळे अकोला बसस्थानकावर असा शुकशुकाट होता. 15 / 25 अकोल्यात अडकलेल्या गाड्यात ५ शिवशाहींचाही समावेश आहे. 16 / 25 एका दिवसात अकोला आगारचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 17 / 25 अकोला आगारासह मंगरुळपीर, वाशिम, अमरावती, पांढरकवडा, कारंजा आणि वाशिम डेपोच्या ६0 च्यावर गाड्या अकोल्यातच थांबविण्यात आल्यात. 18 / 25 खबरदारी म्हणून अकोल्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. 19 / 25 भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 20 / 25 भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 21 / 25 भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 22 / 25 जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. 23 / 25 सकाळपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होते. 24 / 25 प्राथमिक तपासात अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 25 / 25 अनेक आंदोलकांची ओळख पटली असून, काही आंदोलक पोलिसांच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत. आणखी वाचा